Lokmat Money > बिझनेस न्यूज > PF वर मिळणार ८ टक्के व्याज; लाखो नोकरदारांची 'दिन दिन दिवाळी'

PF वर मिळणार ८ टक्के व्याज; लाखो नोकरदारांची 'दिन दिन दिवाळी'

जीपीएफ म्हणजेच जनरल प्रॉव्हिडंट फंड हे असं खातं आहे जे फक्त सरकारी कर्मचारीच उघडू शकतात. सरकारी कर्मचारी या खात्यात स्वतःच्या पगारातील ठरावीक रक्कम ठेवून सदस्य बनू शकतात. 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 06:41 PM2018-10-16T18:41:51+5:302018-10-16T18:42:56+5:30

जीपीएफ म्हणजेच जनरल प्रॉव्हिडंट फंड हे असं खातं आहे जे फक्त सरकारी कर्मचारीच उघडू शकतात. सरकारी कर्मचारी या खात्यात स्वतःच्या पगारातील ठरावीक रक्कम ठेवून सदस्य बनू शकतात. 

government hikes general provident fund interest rate | PF वर मिळणार ८ टक्के व्याज; लाखो नोकरदारांची 'दिन दिन दिवाळी'

PF वर मिळणार ८ टक्के व्याज; लाखो नोकरदारांची 'दिन दिन दिवाळी'

नवी दिल्लीः देशभरातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांचं भविष्य सुकर आणि सुखावह करणाऱ्या जनरल प्रॉव्हिडंट फंड (जीपीएफ) आणि अन्य बचत योजनांवरील व्याजाचा दर ८ टक्के करण्यात आला आहे. केंद्रीय वित्त विभागानं या संदर्भातील परिपत्रक काढलं. ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत कर्मचाऱ्यांना जीपीएफवर ८ टक्क्याने व्याज मिळेल. हा दर गेल्या सहा महिन्यांपासून ७.६ टक्के होता.  

१ ऑक्टोबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत जनरल प्रॉव्हिडंट फंड आणि त्यासारख्या अन्य फंडांमधील खातेदारांना ८ टक्के व्याज मिळेल. नवे व्याज दर केंद्र सरकारी कर्मचारी, रेल्वे आणि संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांच्या पीएफवरही लागू होतील. 

ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीसाठी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रं, किसान विकास पत्रं, पीपीएफ आणि छोट्या बचत योजनांवरील व्याज दर ०.४ टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा सरकारने गेल्या महिन्यात केली होती.   
....

जीपीएफ म्हणजेच जनरल प्रॉव्हिडंट फंड हे असं खातं आहे जे फक्त सरकारी कर्मचारीच उघडू शकतात. सरकारी कर्मचारी या खात्यात स्वतःच्या पगारातील ठरावीक रक्कम ठेवून सदस्य बनू शकतात. 

* जीपीएफ खात्यासंदर्भातील माहिती

या खात्यात जमा केलेली रक्कम सेवानिवृत्तीनंतर कर्मचा-यांना मिळते. तसेच ही गुंतवलेली रक्कम प्राप्तिकर कायदा 80 सीअंतर्गत येत असल्यानं करातूनही सूट मिळते. जीपीएफवरील जमा रकमेवर 8 टक्के व्याज दिलं जाणार आहे. 

* कोण उघडू शकतं खातं- भारत सरकारमध्ये कार्यरत असलेला कोणताही सरकारी कर्मचारी जनरल प्रॉव्हिडंट फंडाचं खातं उघडू शकतो. हे खातं निश्चित पगार असलेल्या कर्मचा-यांसाठी गरजेचं आहे. खासगी क्षेत्रातील कर्मचारी या खात्यासाठी पात्र नसतात. 

* कसं काम करतं जीपीएफ- जनरल प्रॉव्हिडंट फंड एक सेव्हिंग अकाऊंट आहे. या खात्यात निश्चित कालावधीसाठी पगारातील ठरावीक रक्कम जमा करता येते. या खात्यातील रक्कम निवृत्तीनंतर दिली जाते. तसेच खातेधारकाला नॉमिनीही निवडता येऊ शकतो. खातेधारकाचं अपघाती निधन झाल्यास नॉमिनीला फायदे मिळतात.
  
* जीपीएफचे खास फीचर- जीपीएफ खात्यामध्ये तुम्हाला जीपीएफ अॅडवान्स हे फीचर मिळतं. हे जनरल प्रॉव्हिडंट फंड सेव्हिंग खात्यांतर्गत दिलं जातं. तसेच यावर व्याजमुक्त कर्जही मिळते. जीपीएफ खात्यातून काढण्यात आलेल्या रकमेवर कोणताही कर लागत नाही. 

Web Title: government hikes general provident fund interest rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.