Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोनेच नव्हे, आता चांदीच्या दागिन्यांसाठीही हॉल मार्किंग? सरकारच्या हालचाली

सोनेच नव्हे, आता चांदीच्या दागिन्यांसाठीही हॉल मार्किंग? सरकारच्या हालचाली

तंत्रज्ञानाबद्दल खल सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 06:43 IST2024-12-26T06:43:40+5:302024-12-26T06:43:48+5:30

तंत्रज्ञानाबद्दल खल सुरु

Government is preparing to formulate rules for buying and selling silver jewelry | सोनेच नव्हे, आता चांदीच्या दागिन्यांसाठीही हॉल मार्किंग? सरकारच्या हालचाली

सोनेच नव्हे, आता चांदीच्या दागिन्यांसाठीही हॉल मार्किंग? सरकारच्या हालचाली

नवी दिल्ली:चांदी अथवा चांदीचे दागिने खरेदी-विक्री करण्यासाठी नियम बनविण्याची तयारी सरकारने चालविली आहे. आतापर्यंत केवळ सोन्याच्या खरेदीसाठीच असे नियम लागू होते. हॉल मार्किंग नियमांसंबंधीची प्रक्रियाही सरकारने सुरू केली आहे. तांत्रिक समस्यांमुळे यात अडचणी येत आहेत. यातील मुख्य समस्या चांदीवर 'एचयूआयडी' लिहिण्याची आहे. चांदीचीवरील 'एचयूआयडी' सहजपणे बुजून जाते. त्यासाठी काय तंत्रज्ञान वापरावे, यावर विचार केला जात आहे.

का आवश्यक आहे 'एचयूआयडी'? 

'एचयूआयडी मुळे दागिन्यांच्या शुद्धतेची हमी मिळते. दागिन्यावर नमूद केलेल्या शुद्धतेचेच (२२ कॅरेट अथवा १८ कॅरेट) दागिने ग्राहकांना मिळतात. 'एचयूआयडी मध्ये शुद्धते- सोबतच दागिन्याची इतरही सर्व माहिती उपलब्ध असते. 

वजन, निर्माता आणि विक्रीचे स्थान यांचा त्यात समावेश आहे. 'एचयूआ यडी मुळे सरकारसाठी आभूषण व्यव सायावर नजर ठेवणे सोपे होते. १६ जून २०२१ पासून भारतात सोन्यासाठी हॉलमार्किंग बंधनकारक आहे.

Web Title: Government is preparing to formulate rules for buying and selling silver jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Silverचांदी