नवी दिल्ली - भारत सरकारच्या (Indian Government) अणुऊर्जा विभागाशी संलग्न असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL)मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. UCIL ने प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशननुसार या भरतीअंतर्गत सुपरवायझर, असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर अशी एकूण ४७ पदांवर भरती होणार आहे. (Government Job Update)
युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL) ने प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशननुसार विविध पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांची शैक्षणिक योग्यता आणि वयोमर्यादा वेगवेगळी निर्धारित करण्यात आली आहे. यामध्ये इंजिनियरिंगमधील पदवीपासून ते सीएपर्यंतच्या पदवीधारकांना नोकरीची संधी आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा किमान ३० वर्षे ते कमाल ५० वर्षांपर्यंत आहे.
या पदांवर भरतीसाठी ऑफलाइन अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रवेश शुल्क म्हणून ५०० रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जमा करावा लागेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार २० मार्च २०२१ पर्यंत आपला अर्ज दाखल करू शकतात.
या पत्त्यावर पाठवावेत उमेदवारी अर्ज
जनरल मॅनेजर (पर्सनल/प्रोजेक्ट्स)
युरेनियम कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड (UCIL),
पीओ - जादुगडा माइन्स, जिल्हा - सिंहभूम पूर्व
झारखंड, ८३२१०२