Lokmat Money > बिझनेस न्यूज > 'या' सरकारी वेबसाइटवर घाऊक दरात मिळतोय AC! स्टॉक उपलब्ध, आजच करू शकता ऑर्डर

'या' सरकारी वेबसाइटवर घाऊक दरात मिळतोय AC! स्टॉक उपलब्ध, आजच करू शकता ऑर्डर

या प्लॅटफॉर्मवर तुम्ही एअर कंडिशनर (AC) अतिशय स्वस्तात खरेदी करू शकता. येथून खरेदी करताना सदोष उत्पादने मिळणार नाहीत, याची वॉरंटी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 11:36 AM2023-03-16T11:36:42+5:302023-03-16T11:37:01+5:30

या प्लॅटफॉर्मवर तुम्ही एअर कंडिशनर (AC) अतिशय स्वस्तात खरेदी करू शकता. येथून खरेदी करताना सदोष उत्पादने मिळणार नाहीत, याची वॉरंटी आहे.

government marketplace gem is selling air conditioner in half price check list | 'या' सरकारी वेबसाइटवर घाऊक दरात मिळतोय AC! स्टॉक उपलब्ध, आजच करू शकता ऑर्डर

'या' सरकारी वेबसाइटवर घाऊक दरात मिळतोय AC! स्टॉक उपलब्ध, आजच करू शकता ऑर्डर

नवी दिल्ली :  एक काळ असा होता की आपण खरेदीसाठी बाजारात भटकायचो. पाऊस असो वा ऊन... खरेदी करण्यासाठी काहीही करायचे. पण ऑनलाइन शॉपिंगने हा सगळा खेळच उलटला आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे लोक घरी बसून शॉपिंग करतात. मात्र, सरकारी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म  Gem (Government e Marketplace) हा देखील एक चांगला ऑप्शन आहे. 

या प्लॅटफॉर्मवर तुम्ही एअर कंडिशनर (AC) अतिशय स्वस्तात खरेदी करू शकता. येथून खरेदी करताना सदोष उत्पादने न मिळण्याची वॉरंटी आहे. वेबसाइटवरील उत्पादनावर दीर्घ वॉरंटी देखील मिळते. Gem वर अनेक मोठ्या कंपन्यांचे एसी अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहेत. स्प्लिट आणि विंडो एसी येथून आरामात खरेदी करता येतात. LG, Voltas, Hitachi सह अनेक कंपन्यांचे एसी येथे उपलब्ध आहेत. रिसेलर एसी देखील या वेबसाइटवरून खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत, ज्यांची किंमत 5000 रुपयांपासून सुरू होते. तसेच, या वेबसाइटवर विविध किमतीत एसी उपलब्ध आहेत.

Whirlpool 1 Ton AC
Whirlpool 1 Ton AC ची किंमत 63,200 रुपये आहे. मात्र, सरकारी वेबसाइटवर ते 23,700 रुपयांना खरेदी करता येईल. याची 12 महिन्यांची वॉरंटी मिळत आहे.

Voltas Window AC
Voltas च्या Window AC ची लॉन्चिंग किंमत 28,490 रुपये आहे. पण या वेबसाइटवर 24,900 रुपयांना विकत घेता येईल. AC वर 36 महिन्यांची वॉरंटी उपलब्ध आहे.

काय आहे वेबसाइटची खासियत?
सरकारी बाजारपेठेतून उत्पादने खरेदी करून ग्राहकांना कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही, त्यामुळे फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनच्या तुलनेत ते खूप किफायतशीर ठरू शकते.

Web Title: government marketplace gem is selling air conditioner in half price check list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.