नवी दिल्ली - अर्थ मंत्रालय लवकरच 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांची नाणी चलनात आणत आहे. ही नाणी अधिसूचित करण्यात आली आहेत. ज्या दिवशी ही अधिसूचना गॅझेटमध्ये प्रकाशित होईल, त्या दिवसापासून हा नवा नियम अस्तित्वात येणार आहे. या नाण्यांच्या डिझाईनविषयीची माहिती अहवालात देण्यात आली आहे. त्यानुसार एक रुपयाच्या नाण्याच्या दर्शनी भागावर अशोक स्तंभ असेल तसेच 'सत्य मेव जयते' असं लिहिलेलं असेल. हिंदीत भारत आणि इंग्रजी भाषेत इंडिया असं लिहिलेलं असेल. मागील बाजूस 'आजादी का अमृत महोत्सव' चा अधिकृत लोगो असेल. या लोगोखाली एक रुपये लिहिलेलं असेल.
इंग्रजीत 75TH YEAR OF INDEPENDENCE असं लिहिलेलं असेल. ज्यावर्षी हे नाणं तयार होईल, त्या वर्षाचा उल्लेख त्यावर असेल. 2 रुपयांच्या नाण्याच्या मागील बाजूला 'आजादी का अमृत महोत्सव' हा अधिकृत लोगो असेल. लोगो खाली 2 रुपये असं लिहिलेलं असेल. तसेच इंग्रजीत 75TH YEAR OF INDEPENDENCE लिहिलेलं असेल. ज्या वर्षी या नाण्याची निर्मिती केली जाईल त्यावर्षाचा उल्लेख नाण्यावर असेल. पुढील बाजूला अशोक स्तंभ असेल. तसेच सत्य मेव जयते लिहिलेलं असेल. हिंदी भाषेत भारत तर इंग्रजीत इंडिया लिहिलेलं असेल.
75TH YEAR OF INDEPENDENCE असं लिहिलेलं असेल
5 रुपयांच्या नाण्याच्या पुढील बाजूला अशोक स्तंभ असेल. तसेच 'सत्यमेव जयते' लिहिलेलं असेल. हिंदीत भारत तर इंग्रजी इंडिया लिहिलेलं असेल. मागील बाजूला 'आजादी का अमृत महोत्सव' हा अधिकृत लोगो असले. लोगो खाली 5 रुपये लिहिलेलं असेल. तसेच इंग्रजीत 75TH YEAR OF INDEPENDENCE लिहिलेलं असेल. ज्या वर्षी नाण्याची निर्मिती होईल, त्या वर्षाचा उल्लेख नाण्यावर असेल. 10 रुपयांच्या नाण्याच्या मागील बाजूस 'आजादी का अमृत महोत्सव' चा अधिकृत लोगो असेल. या लोगोखाली 10 रुपये लिहिलेलं असेल. इंग्रजीत 75TH YEAR OF INDEPENDENCE असं लिहिलेलं असेल. ज्यावर्षी हे नाणं तयार होईल, त्या वर्षाचा उल्लेख त्यावर असेल.
अशोक स्तंभ आणि 'सत्यमेव जयते'
पुढील बाजूला अशोक स्तंभ असेल. तसेच 'सत्यमेव जयते' असं लिहिलेलं असेल. हिंदीत भारत आणि इंग्रजी भाषेत इंडिया असं लिहिलेलं असेल. 10 रुपयांच्या नाण्याच्या पुढील बाजूला अशोक स्तंभ असेल आणि 'सत्यमेव जयते' असं लिहिलेलं असेल. हिंदी भाषेत भारत तर इंग्रजी भाषेत इंडिया असं लिहिलेलं असेल. मागील बाजूला 'आजादी का अमृत महोत्सव' असा अधिकृत लोगो असेल. लोगोखाली 10 रुपया असं लिहिलेलं असेल. इंग्रजीत 75TH YEAR OF INDEPENDENCE लिहिलेलं असेल. ज्या वर्षी या नाण्याची निर्मिती केली जाईल, त्या वर्षाचा उल्लेख नाण्यावर असेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.