नवी दिल्ली : महागाईचा दर जानेवारीत संपूर्णत: उतरून शून्याच्या खाली गेला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती उतरल्यामुळे देशातही पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले. त्याचा परिणाम म्हणून जानेवारीतील ठोक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाईचा दर 0.३९ टक्क्यांवर गेला आहे.
जानेवारीमध्ये ठोक महागाईचा दर शून्याच्या खाली गेलेला दिसत असला तरी याच काळात खाद्यवस्तूंच्या किमती मात्र वाढल्या आहेत.
ठोक मूल्य निर्देशांकावर आधारित महागाईचा दर डिसेंबरमध्ये 0.११ टक्के होता. नोव्हेंबरच्या आकड्यातही सरकारने सुधारणा केली असून हा आकडाही घटून 0.१७ टक्के झाला आहे. अस्थाई आकड्यांनुसार नोव्हेंबरातील महागाईचा दर शून्य होता.
सरकारने सोमवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारीत खाद्यवस्तूंची महागाई तब्बल आठ टक्के होती. हा दर गेल्या सहा महिन्यांचा नीचांक आहे. जानेवारीत डाळी आणि भाजीपाल्याचा दर आदल्या महिन्याच्या तुलनेत अधिक राहिला. बटाटे, दूध, तांदूळ, अंडी, मांस आणि मासळी आदी प्रोटीनयुक्त खाद्यवस्तूंचे भाव मात्र जानेवारीत कमी राहिले. जून २00९ मध्ये महागाई शून्याच्या खाली गेली होती. त्या महिन्यात महागाईचा दर उणे 0.४ टक्के झाला होता.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी याच महिन्यात सादर केलेल्या पतधोरण आढाव्यात मुख्य व्याजदर कपात करण्यास नकार दिला होता. महागाईचा दर सुसह्य पातळीला येईपर्यंत व्याजदर घटणार नाही, असे राजन यांनी म्हटले होते. किरकोळ क्षेत्रातील महागाईचा दर जानेवारी २0१६ पर्यंत ६ टक्क्यांच्या अपेक्षित स्तरावर येऊ शकेल. तथापि, मान्सून आणि तेलाच्या किमतीची जोखीम हा या मार्गातील मुख्य धोका आहे, असेही राजन यांनी नमूद केले होते.
इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाई शून्याच्या खाली उणे १0.६0 टक्के कमी राहिली. उत्पादित वस्तूंची महागाई १.0५ टक्के होती.
पेट्रोलच्या भावात जानेवारीत १७.0८ टक्के संकोच झाला. डिसेंबरमध्ये तो ११.९६ टक्के होता. डिझेलच्या किमतीतही आदल्या महिन्याच्या तुलनेत अधिक घट झाली.
प्राथमिक उत्पादन क्षेत्रातील महागाई जानेवारीत वाढून ३.२७ टक्के झाली. डिसेंबरमध्ये ती २.१७ टक्के होती.
सरकारी कागदावरील महागाई शून्याखाली !
महागाईचा दर जानेवारीत संपूर्णत: उतरून शून्याच्या खाली गेला आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती उतरल्यामुळे देशातही पेट्रोल-डिझेल स्वस्त झाले.
By admin | Published: February 17, 2015 12:26 AM2015-02-17T00:26:45+5:302015-02-17T00:26:45+5:30