Join us

सरकारला ५ कंपन्यांकडून मिळाला ₹४०१ कोटींचा डिविडंट, एकट्या माझगाव डॉककडून ११७ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 2:44 PM

भारत सरकारला पाच सरकारी कंपन्यांकडून डिविंडट म्हणून सुमारे ४०१ कोटी रुपये मिळाले आहेत.

भारत सरकारला पाच सरकारी कंपन्यांकडून डिविंडट म्हणून सुमारे ४०१ कोटी रुपये मिळाले आहेत. या कंपन्यांमध्ये एडसीआयएल (इंडिया) लिमिटेड, मिश्रा धातू निगम लिमिटेड (Mishra Dhatu Nigam), भारत डायनॅमिक्स लिमिटेड (Bharat Dynamics Ltd), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (Bharat Electronics ltd) आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders) यांचा समावेश आहे. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (DIPAM) विभागाचे सचिव तुहीन कांत पांडे यांनी गुरुवारी एका ट्विटमध्ये ही माहिती दिली.सरकारला EdCIL (इंडिया) लिमिटेडकडून लाभांश म्हणून २० कोटी रुपये मिळाले आहेत. मिश्रा धातू निगमनं सरकारी तिजोरीत २३ कोटींची भर घातली आहे, तर भारत डायनॅमिक्सने १६ कोटींची भर घातली आहे. याशिवाय भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडनं लाभांशाचा हप्ता म्हणून २२५ कोटी रुपये दिले आहेत आणि माझगाव डॉक शिपबिल्डर्सनं ११७ कोटी रुपये लाभांश हप्ता म्हणून सरकारला दिले आहेत. चालू आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि वित्तीय संस्थांकडून सरकारला सुमारे ४८ हजार कोटी रुपयांचा डिविडंट मिळण्याची अपेक्षा आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १७ टक्क्यांनी अधिक आहे. अर्थसंकल्पीय दस्तऐवजानुसार, सरकारला सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि इतर गुंतवणुकीतून २०२४ या आर्थिक वर्षात सुमारे ४३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक मिळण्याची अपेक्षा आहे.डिविडंट यील्डमिश्र धातू निगमचा डिविडंट यील्ड सध्या ०.८९ टक्के आहे. २०२३ मध्ये या शेअरची किंमत ६८.२३ टक्क्यांनी वाढलीये. तर भारत डायनॅमिक्समध्ये २२.७६ टक्क्यांची तेजी आली असून त्यानं ०.८१ टक्क्यांचा रिटर्न दिलाय.भारत इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअरमध्ये यावर्ष ४०.०५ टक्क्यांची तेजी आलीये आणि त्यांचा डिविडंट यील्ड १.२८ टक्के आहे. तर माझगाव शिपबिल्डर्सनं १५९.३४ टक्के मल्टीबॅगर रिटर्न दिलाय. याचा डिविडंट यील्ड सध्या १.०९ टक्के आहे.

टॅग्स :सरकार