Join us  

सरकारनं सब्सिडी कमी केली, Electric दुचाकींची विक्रीच मंदावली; २२ हजारांपर्यंत किंमतीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 5:50 PM

सरकारनं इलेक्ट्रिक दुचाकींवरील सब्सिडी कमी केल्यानंतर कंपन्यांनी किंमतीत केलेल्या वाढीचा विपरित परिणाम त्यांच्या विक्रीवरच झाला आहे.

सरकारनं इलेक्ट्रिक दुचाकींवरील सब्सिडीमध्ये कपात केल्यानंतर त्यांच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. सरकारच्या 'वाहन' पोर्टलच्या आकडेवारीनुसार, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 11,862 वाहनांची नोंदणी झाली होती, तर मे महिन्यात याच कालावधीत सुमारे 44,700 वाहनांची नोंदणी झाली होती. मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत मोठी घट झाली आहे.

वाहन पोर्टलच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात विक्री झालेल्या एकूण 14,97,956 दुचाकींपैकी 7.73 टक्के इलेक्ट्रिक दुचाकी आहेत. जूनमध्ये आतापर्यंत ही आकडेवारी कमी होऊन 2.65 टक्क्यांवर आली. मे महिन्याच्या तुलनेत इलेक्ट्रिक दुचाकींची सरासरी दैनंदिन विक्री 62 टक्क्यांनी कमी झाली आहे. या महिन्यात वाहन नोंदणीचा ​​आकडा 30 हजारांच्या पुढे जाणार नाही, अशी भीती इलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपन्यांनी व्यक्त केलीये. ही संख्या फेब्रुवारी 2022 नंतर सर्वात कमी ठरण्याची शक्यता आहे. त्या महिन्यात केवळ 29,000 वाहनांची नोंदणी झाली होती.

दोन मोठ्या कंपन्यांचा समावेशविक्रीत घट झालेल्या कंपन्यांमध्ये दोन मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे. त्यापैकी एका कंपनीची 15 जूनपर्यंत कंपनीने केवळ 762 वाहनांची नोंदणी झाली, तर अन्य कंपनीच्या केवळ 425 वाहनांची नोंदणी झाली. अन्य एका कंपनीने जूनच्या पहिल्या पंधरवड्यात केवळ 23 वाहनांची नोंदणी केली होती, तर मे महिन्यात ही संख्या 972 होती. इलेक्ट्रीक दुचाकीची विक्री करणाऱ्या आणखी एका कंपनीनं मे महिन्यात 14,271 वाहनांची नोंदणी केली होती. परंतु जूनमध्ये ही संख्या 1,127 वाहनांवर आली.

कंपन्यांनी वाढवल्या किंमतीसब्सिडी कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयानंतर, जूनच्या पहिल्या आठवड्यातच, बहुतेक कंपन्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती 6,000 ते 22,000 रुपयांनी वाढवल्या. त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकींच्या किमतीत 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. यामुळे ई-स्कूटर्सची किंमत 1.5 लाख रुपये आणि त्याहून अधिक झाली आहे.

टॅग्स :इलेक्ट्रिक कार / स्कूटरसरकार