Join us

आता घोडा, गाढव, खेचर, उंट पाळण्यासाठी सरकार देणार पैसे, ₹10 कोटींचं लोन अन् 50% सब्सिडी, जाणून घ्या डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 8:54 PM

केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेत सुधारणा केली असून ग्रामीण भागात राहणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

जर आपण पशुपालनासंदर्भात काही उद्योग-व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. आपल्याला केंद्र सरकार पशुपालनाशी संबंधित व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करेल. केंद्र सरकारने राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेत सुधारणा केली असून ग्रामीण भागात राहणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

50% पर्यंत मिळणार सब्सिडी -केंद्र सरकारने घोडा, गढव, खच्चर आणि ऊंटाशी संबंधित उद्योग सुरू करण्यासाठी लोकांना आणि संघटनांना 50% पर्यंत सब्सिडी (Subsidy) देण्याबरोबरच विविध उपक्रमांचा समावेश करून राष्ट्रीय पशुधन मिशन योजनेत (National Livestock Mission Scheme) सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे. सुधारित राष्ट्रीय पशुधन मिशन योजनेंतर्गत, केंद्र सरकार घोडे, गाढवे आणि उंटांसाठी वीर्य केंद्रे (Semene) आणि प्रजनन फार्म (Breeding Farm) उघडण्यासाठी 10 कोटी रुपये देणार आहे.

कुणाला होणार फायदा -संशोधित एनएलएम (NLM) अंतर्गत, घोडे, गढवे, खच्चर आणि ऊंटांशी संबंधित उद्योग सुरू करण्यासाठी व्यक्ती, शेतकरी उत्पादक संघटना (FPOs), बचतगट (SHGs) आणि कलम 8 कंपन्यांना 50% पर्यंतची सबसिडी दिली जाईल. या शिवाय घोडे, गाढवे आणि उंटांच्या जातीच्या संवर्धनासाठीही राज्य सरकारला मदत केली जाईल.

पशुधन विम्याचा हप्ता केला कमी -याशिवाय, पशुधन विमा कार्यक्रमही सुलभ करण्यात आला आहे. शेतकऱ्यांसाठी प्रीमियमचा लाभार्थी हिस्सा कमी करण्यात आला आहे. तसेच, विमा काढण्यात येणाऱ्या जनावरांची संख्याही 5 वरून 10 करण्यात आली आहे. 

टॅग्स :केंद्र सरकारशेतकरीव्यवसाय