Join us

2 हजाराच्या नोटांची छपाई बंद, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2019 11:47 AM

केंद्र सरकारकडून 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. या निर्णयामागे 2 हजार रुपयांच्या नोटा हळू-हळू व्यवहारातून बंद करण्याचा कोणताही संबंध नसल्याचंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

ठळक मुद्दे2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद2000 नोटांचं चलनात 35 टक्के प्रमाणगरजेपेक्षा अधिक 2,000 रुपयांच्या नोटा चलनात

नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून 2 हजार रुपयांच्या नोटांची छपाई बंद करण्यात आली आहे. या निर्णयामागे 2 हजार रुपयांच्या नोटा हळू-हळू व्यवहारातून बंद करण्याचा कोणताही संबंध नसल्याचंही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पण, बाजारात 2 हजार रुपयांच्या नोटांची संख्या पर्याप्त प्रमाणात उपलब्ध असल्यानं सध्या छपाई थांबवण्यात आल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले आहे. 

आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी सांगितले की, व्यवहारातील एकूण चलनापैकी 35 टक्के 2 हजार रुपयांच्या नोटा प्रचलनात आहेत. पुढे त्यांनी असेही सांगितले की, नोटांची छपाई आवश्यकतेनुसार केली जात आहे. सध्या आपल्याकडे गरजेपेक्षा अधिक 2,000 रुपयांच्या नोटा आहेत, व्यवहारात या नोटांचे एकूण 35 टक्के एवढं प्रमाण आहे. 

(PM Narendra Modi Interview: नोटाबंदी हा झटका नव्हता; जनतेला वर्षापूर्वीच कल्पना दिली होती)

दरम्यान, नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच चलनात आणलेल्या 2000 रुपयांच्या नोटांची छपाई रिझर्व्ह बँकेनं घटवल्याची चर्चा सुरू होती. 2000च्या नोटा काळा पैसा दडवून ठेवण्यासाठी, करचोरीसाठी आणि मनी लाँडरिंगसाठी होत असल्याचा संशयामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात होते. 

(नवीन वर्षात काळजी वाढली, प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर 62 हजार रुपयांचे कर्ज)

2016 मध्ये मोदी सरकारनं नोटाबंदीचा निर्णय लागू केल्यानंतर 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या होत्या. यानंतर 2000 रुपयांची नोट चलनात आणण्यात आली.  

टॅग्स :नोटाबंदीभारतीय रिझर्व्ह बँकनरेंद्र मोदी