Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्याजाची हमी देणारी सरकारी स्कीम, १० लाखांच्या गुंतवणूकीवर ५ वर्षात मिळतील १४ लाख ४९हजार

व्याजाची हमी देणारी सरकारी स्कीम, १० लाखांच्या गुंतवणूकीवर ५ वर्षात मिळतील १४ लाख ४९हजार

तुम्ही सुरक्षित आणि खात्रीशीर परताव्यासह गुंतवणूकीचा पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये गुंतवणूक करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 12:58 PM2023-08-25T12:58:57+5:302023-08-25T13:00:06+5:30

तुम्ही सुरक्षित आणि खात्रीशीर परताव्यासह गुंतवणूकीचा पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये गुंतवणूक करू शकता.

Government scheme guaranteeing interest 14 lakhs 49 thousand in 5 years on investment of 10 lakhs national saving certificate post scheme investment tips | व्याजाची हमी देणारी सरकारी स्कीम, १० लाखांच्या गुंतवणूकीवर ५ वर्षात मिळतील १४ लाख ४९हजार

व्याजाची हमी देणारी सरकारी स्कीम, १० लाखांच्या गुंतवणूकीवर ५ वर्षात मिळतील १४ लाख ४९हजार

Post Office NSC Interest rate: तुम्ही सुरक्षित आणि खात्रीशीर परताव्यासह गुंतवणूकीचा पर्याय शोधत असाल तर पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये गुंतवणूक करू शकता. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) ही एक उत्तम योजना आहे. काही वेळा अशी परिस्थिती येते जेव्हा तुमच्याकडे पैसे असतात, परंतु तुम्ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत पैसे स्कीममध्ये ठेवू शकता. परंतु, पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेत गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. तसेच यामध्ये तुम्हाला अनेक खाती उघडता येतात. यावर कर सूट देखील उपलब्ध आहे. याशिवाय या योजनेत इतरही अनेक फायदे आहेत.

डबल फायदा
पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) योजनेचा मॅच्युरिटी कालावधी ५ वर्षांचा आहे. यामध्ये वार्षिक ७.७ टक्के व्याज देण्यात येतं. तुम्हाला व्याजावर दुहेरी फायदादेखील मिळतो. म्हणजे व्याज वार्षिक आधारावर चक्रवाढ पद्धतीनं तुम्हाला व्याज दिलं जातं. परंतु यातून तुम्ही कोणतंही पार्शल विड्रॉव्हल करू शकत नाही. तुम्हाला पैसे पूर्ण पेमेंट मॅच्युरिटी झाल्यावरच मिळेल. पोस्ट ऑफिसच्या वेबसाइटनुसार, योजनेत १००० रुपये जमा केल्यास ५ वर्षानंतर तुम्हाला १४४९ रुपये मिळतील.

१० लाखांवर किती फायदा
पोस्ट ऑफिस एनएससी कॅल्क्युलेटरनुसार, योजनेमध्ये १० लाख रुपयांची एकरकमी गुंतवणूक केल्यास ५ वर्षानंतर मॅच्युरिटीवर एकूण १४,४९,०३९ रुपये मिळतील. यामध्ये ४,४९,०३४ रुपये फक्त व्याजातून मिळतील. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) मध्ये गुंतवणूक कुठूनही करता येते आणि कोणत्याही पोस्ट ऑफिसच्या ब्रान्चमध्ये जाऊन करता येते. एनएसई खातं किमान १००० रुपयांनी उघडता येतं. कमाल गुंतवणूकीची मर्यादा नाही. कोणतीही रक्कम १०० च्या पटीत जमा केली जाऊ शकते. गुंतवणुकीवर सरकारी हमी उपलब्ध आहे.

कोण उघडू शकतं खातं
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये उघडता येते. विशेष बाब म्हणजे यात कोणताही नागरिक यात खातं उघडू शकतो. यामध्ये जॉइंट अकाउंटची सुविधाही आहे. १० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचे पालक त्यांच्या वतीनं प्रमाणपत्र खरेदी करू शकतात. एनएसई मध्ये ५ वर्षापूर्वी विड्रॉल करता येत नाही. सवलत काही विशिष्ट परिस्थितीतच उपलब्ध आहेत. सरकार दर ३ महिन्यांनी एनएसईचे व्याजदर निश्चित करत असते.

Web Title: Government scheme guaranteeing interest 14 lakhs 49 thousand in 5 years on investment of 10 lakhs national saving certificate post scheme investment tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.