लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : ज्यांच्या घरामध्ये एअर कंडिशनर, कार व फ्रीज असेल, त्यांना यापुढे केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार नाही. तसा निर्णय लवकरच घेण्यात येणार असून, त्यासाठी शहरी भागातील कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीची केंद्र सरकारतर्फे पाहणी केली जाणार आहे.
या पाहणीतून तुम्हाला खरोखरच सरकारच्या कल्याणकारी योजनांची आवश्यकता आहे का, हे तपासले जाईल. ज्यांना कल्याणकारी योजनांचा फायदा मिळतो, त्यापैकी सहा जणांना त्याची गरज नसते,
असा अंदाज आहे. त्यामुळे या योजनांना लाभ भविष्यात कमी लोकांना मिळेल. विवेक देवरॉय यांच्या कमिटीच्या प्रस्तावानुसार
केंद्र सरकारने शहरी भागातील कुटुंबांसाठी नवी रूपरेषा आखली आहे.
शहरी भागातील ज्या कुटुंबाकडे चार रुमचा फ्लॅट, कार अथावा घरात एअर कंडिशनर आहे, त्यांनी
स्वत:हून स्वत: कल्याणकारी योजनेतून बाहेर पडावे, अशी केंद्र सरकारची अपेक्षा आहे.
जी कुटुंबे अगदीच बेघर
आहेत, कशीबशी प्लॅस्टिकच्या छप्परखाली राहतात, ज्या कुटुंबांच्या कमाईचे काही निश्चित व कायमस्वरूपी साधन नाही, ज्या कुटुंबांमध्ये कमावण्याचे वय
असलेला पुरुष सदस्य नाही
आणि केवळ लहान मुलेच आहेत, अशांनाच कल्याणकारी योजनांशी जोडून घेण्यात येणार आहे.
विशिष्ट कुटुंबाला लाभार्थ्यांच्या यादीत टाकण्याची गरज आहे वा
नाही, हेही या पाहणीतून शोधण्यात येणार आहे. ही पाहणी कुटुंबांची आर्थिक, सामाजिक, राहण्याची स्थिती, नोकरीतील हुद्दा अशा १२ भागांमध्ये असेल. म्हणजेच १२ निकषांच्या आधारे विशिष्ट कुटुंबाला कल्याणकारी योजनांचे फायदे द्यायचे वा नाहीत, हे ठरविले जाईल.
मोठे सर्वेक्षण लवकरच
हाशिम समितीने २0१२ साली शहरी भागोतील कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर एक अहवाल केंद्र सरकारकडे दिला होती. तो अहवाल स्वीकारण्यात आला नव्हता.
हाशिम समितीच्या शिफारशींनुसार केंद्राच्या विविध कल्याणकारी योजनांच्या लाभासाठी ४१% कुटुंबाचे सर्वेक्षण करावे लागणार होते.
देवरॉय समितीच्या शिफारशीनुसार
आता ५९% परिवार सर्वेक्षणामध्ये
येणार आहेत, असे सांगण्यात येते.
कार, एसी, फ्रीज असल्यास सरकारी योजनांचे लाभ नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 01:17 AM2017-08-08T01:17:46+5:302017-08-08T01:17:56+5:30