नवी दिल्ली : डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने करात सूट आणि इतर मार्गाने लाभ मिळवून दिला पाहिजे, असे मत कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या व्यापाºयांच्या सर्वांत मोठ्या संघटनेने व्यक्त केले आहे.
कॅटचे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी मंगळवारी नवी दिल्लीत आयोजित पत्रपरिषदेत केंद्र सरकारच्या डिजिटल पेमेंटला चालना देण्याच्या प्रयत्नांचे जोरदार समर्थन केले. तथापि सरकारचे हे प्रयत्न यशस्वी होण्यासाठी ग्राहकांपासून तर दुकानदारांपर्यंत सर्वांना यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
आज क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्याने अतिरिक्त पैसे मोजावे लागतात. त्यामुळे ग्राहक डिजिटल पद्धतीने पेमेंट करण्यास तयार होत नाही आणि व्यापारीही आपल्या मार्जिनमधून हा अतिरिक्त खर्च सहन करण्यास तयार नाही, असे खंडेलवाल यांनी स्पष्ट केले.दरम्यान कॅटतर्फे मंगळवारी अलायन्स फॉर डिजिटल भारताच्या आराखड्यासाठी आपल्या काही सूचना असलेला ‘युनिव्हर्सल अॅक्सेस टू इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड पेमेंट सिस्टिम’ हा अहवाल जारी केला. कॅटने यासंदर्भात एक वेबसाईटही सुरू केलेली आहे.
खंडेलवाल पुढे म्हणाले, डिजिटल पेमेंटसाठी केवळ ग्राहकांना कर सवलत अथवा अन्य प्रोत्साहन दिले जाऊ नयेत तर डिजिटल पेमेंट स्वीकार करणाºया दुकानदारांनाही प्रोत्साहन देण्यासाठी एखादा पुरस्कार सुरू केला पाहिजे. खंडेलवाल यांनी रूपे कार्डवर निगराणी ठेवण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची सूचना केली.
डिजिटल व्यवहाराला गती देण्यासाठी सरकारने कर सवलत व प्रोत्साहन द्यावे -कॅट
डिजिटल व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने करात सूट आणि इतर मार्गाने लाभ मिळवून दिला पाहिजे, असे मत कॉन्फेडरेशन आॅफ आॅल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या व्यापाºयांच्या सर्वांत मोठ्या संघटनेने व्यक्त केले आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:29 AM2017-09-06T01:29:33+5:302017-09-06T01:29:48+5:30