Join us

सरकार ऊर्जित पटेल यांना पदावरून घालवणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 5:39 AM

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना पदावरून हाकलणार येणार नाही, असे संकेत केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आले आहे.

नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना पदावरून हाकलणार येणार नाही, असे संकेत केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेसोबतच्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर पटेल यांना पदावरून काढण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून असे संकेत मिळत आहेत.सरकारी सूत्रांनी सांगितले की, सरकार आणि केंद्रीय बँकेत मतभेद होणे ही काही नवी बाब नाही. यापूर्वीच्या अनेक सरकारांच्या काळातही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. ऊर्जित पटेल यांचा कार्यकाळ पुढील वर्षी आॅगस्टमध्ये संपत आहे. ते तो पूर्ण करतील.सुमारे १0 दिवसांपूर्वी सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यातील तणावाला प्रारंभ झाला होता. आरबीआय कायद्याच्या कलम ७ अन्वये सरकारने रिझर्व्ह बँकेसोबत औपचारिक चर्चा करण्याचे प्रस्तावित केल्यामुळे पटेल हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त गेल्या बुधवारी आले होते.रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता महत्त्वाची असली तरी लोकहितासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँकेने एकत्र येऊन काम करायला हवे, असे निवेदन सरकारच्या वतीने लगोलग जारी करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)‘सिद्धूसारखे नव्हे, द्रविडसारखे असावे’दरम्यान, सरकार-रिझर्व्ह बँक वादाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले की, ‘रिझर्व्ह बँकेचे बोर्ड क्रिकेटपटू राहुल द्रविडसारखे असावे; नवज्योतसिंग सिद्धूसारखे नसावे.’ राहुल द्रविड हा भारतीय क्रिकेट संघात मजबूत भिंतीसारखा टिकून खेळायचा, प्रसंगी मोलाचे मार्गदर्शनही करायचा. नवज्योतसिंग सिद्ध मात्र आक्रमक खेळी आणि भडक वक्तव्यांसाठी प्र्रसिद्ध आहेत. 

टॅग्स :उर्जित पटेलभारतीय रिझर्व्ह बँकसरकार