Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकार १२ आजारी बँकांना देणार आणखी ४८ हजार कोटींचे भांडवल

सरकार १२ आजारी बँकांना देणार आणखी ४८ हजार कोटींचे भांडवल

बुडित कर्जांमुळे आर्थिक स्थिती नाजूक झालेल्या सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांना भांडवल पूर्ततेसाठी आणखी ४८,२३९ कोटी रुपये देण्याचे केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 08:03 AM2019-02-21T08:03:25+5:302019-02-21T08:03:35+5:30

बुडित कर्जांमुळे आर्थिक स्थिती नाजूक झालेल्या सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांना भांडवल पूर्ततेसाठी आणखी ४८,२३९ कोटी रुपये देण्याचे केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केले.

 The government will provide another Rs. 48 thousand crore capital to 12 sick banks | सरकार १२ आजारी बँकांना देणार आणखी ४८ हजार कोटींचे भांडवल

सरकार १२ आजारी बँकांना देणार आणखी ४८ हजार कोटींचे भांडवल

नवी दिल्ली : बुडित कर्जांमुळे आर्थिक स्थिती नाजूक झालेल्या सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांना भांडवल पूर्ततेसाठी आणखी ४८,२३९
कोटी रुपये देण्याचे केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केले. वित्त मंत्रालयातील वित्तीय सेवा सचिव राजीव कुमार यांनी ही माहिती देताना सांगितले की, अडचणीत सापडलेल्या या बँकांना भांडवलापोटी ही सर्व रक्कम चालू वित्तीय वर्षातच दिली जाईल. याआधी सरकारने डिसेंबरमध्ये सात सार्वजनिक बँकांना अशाच प्रकारे भांडवलापोटी २८,६१५ कोटी रुपये दिले होते. बुडित कर्जांचा डोंंगर कमी होण्याऐवजी वाढत चाललेल्या अशा या बँका आहेत. या बुडित कर्जांमुळे या बँकांचा भांडवली पाया खिळखिळा झाला आहे. म्हणजेच सर्व संभाव्य देणी देण्यासाठी भांडवली गंगाजळी अपुरी पडेल, अशी त्यांची स्थिती आहे. या बँकांची विपन्नावस्था अधिक खालावू नये यासाठी रिझर्व्ह बँकेने त्यांना कर्जवसुलीचे कडक निकष ठरवून देण्याखेरीज नव्या कर्जवाटपावरही त्यांच्या स्थितीनुसार कमीअधिक निर्बंध घातले आहेत.
बँका बुडू नयेत यासाठी जागतिक पातळीवर ठरलेले भांडवली पर्याप्ततेचे निकष भारतानेही स्वीकारले आहेत. या बँकांना ते निकष पाळता यावेत यासाठी सरकार त्यांना भांडवलवाढीसाठी अशी रक्कम देऊन मदत करत असते.
>बँकनिहाय रक्कम (कोटी रुपयांमध्ये)
कॉर्पोरेशन बँक ९,०८६
अलाहाबाद बँक ६,८९६
बँक आॅफ इंडिया ४,६३८
बँक आॅफ महाराष्ट्र २०५
पंजाब नॅशनल बँक ५,९०८
युनियन बँक आॅफ इंडिया ४,११२
आंध्र बँक ३,२५६
सिंडिकेट बँक १,६०३

Web Title:  The government will provide another Rs. 48 thousand crore capital to 12 sick banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक