Indian Semiconductor Companies : सेमीकंडक्टर्स (Semiconductor) आणि सेन्सर्सच्या क्षेत्रात कर्मशिअलायझेशनच्या टप्प्यात नवीन तंत्रज्ञान असलेल्या भारतीय कंपन्यांना आता त्यासाठी कर्ज, इक्विटी आणि अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य मिळण्याची उत्तम संधी आहे. देशाची गरज आणि सेमीकंडक्टर, तसंच सेन्सर डोमेनमधील कमर्शिअलायझेशनवर लक्ष केंद्रित करून सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन, डिस्प्ले फॅब्रिकेशन, इंटिग्रेटेड सर्किट (IC), चिपसेट, चिप्स ऑन सिस्टम (SOSC) इत्यादींसाठी इलेक्ट्रॉनिक आणि सेमीकंडक्टर क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत भारतीयांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.
कमर्शिअलायझेशन, वैज्ञानिक, तांत्रिक, आर्थिक आणि व्यावसायिक गुणवत्तेच्या आधारावर मूल्यांकनासाठी भारतीय कंपन्यांना कर्ज, इक्विटी आणि अनुदानाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य आणि तंत्रज्ञान विकास मंडळाने प्रस्ताव मागवले आहेत. भारतीय कंपन्यांना कमर्शिअलायझेशन, वैज्ञानिक, आर्खिक, वाणिज्यिक योग्यत अथवा आर्थिक मदतीच्या आधारावर मूल्यांकनासाठी लोन, इक्विटी आणि अनुदानाच्या रूपात आर्थिक मदत करण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. अर्ज करणाऱ्या कंपन्या भारतीय कंपन्या (कंपनी कायदा, 1956/2013 नुसार) किंवा DPIIT कडून मान्यता प्रमाणपत्र असलेले स्टार्ट-अप असावेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनेचा उद्देश भारताला इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाइन आणि उत्पादनासाठी जागतिक केंद्र म्हणून स्थापित करणे आहे. चिपसेटसह प्रमुख घटकांच्या विकासासाठी सरकारने अनेक पुढाकार घेतले आहेत आणि उद्योगांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सक्षम वातावरण निर्माण केले आहे.
गुंतागुंतीचं क्षेत्र
सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले हे इंडस्ट्री 4.0 अंतर्गत डिजिटल परिवर्तनाचा पुढील टप्पातील आधुनिक इलेक्ट्रॉनिक्सचा आधार आहेत. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंग हे अतिशय गुंतागुंतीचे आणि तंत्रज्ञान-केंद्रित क्षेत्र आहेत, ज्यामध्ये उच्च भांडवली गुंतवणूक, उच्च जोखीम, दीर्घ पूर्व-उत्पादन आणि नफा घेण्याचा कालावधी आणि तंत्रज्ञानातील जलद बदल यांचा समावेश आहे. यासाठी महत्त्वपूर्ण आणि शाश्वत गुंतवणूक आवश्यक आहे. भांडवल-सहाय्य आणि तांत्रिक सहाय्य सुलभ करून सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले मॅन्युफॅक्चरिंगला क्षेत्रात वाढ केली जाईल.