Join us

लघू व मध्यम उद्योगांवर सरकारचे लक्ष : जयकुमार रावल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 1:08 AM

राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी लघू व मध्यम उद्योगांच्या (एसएमई) क्लस्टरवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी या क्षेत्राशी संबंधित परिषदेवेळी दिली.

मुंबई : राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी लघू व मध्यम उद्योगांच्या (एसएमई) क्लस्टरवर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी या क्षेत्राशी संबंधित परिषदेवेळी दिली. आॅल इंडिया असोसिएशन आॅफ इंडस्ट्रीज (एआयएआय) व वर्ल्ड ट्रेड सेंटरतर्फे ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र  गुंतवणूक परिषदेच्या पार्श्वभूमीवर लघू व मध्यम उद्योगांसंबंधी विशेष परिषद वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे झाली.या परिषदेत रावल म्हणाले, मॅग्नेटिक महाराष्टÑमध्ये लाखो कोटी रुपयांचे करार झाले. त्यातून मोठे उद्योग स्थापन होतील. या मोठ्या उद्योगांना कच्चा माल पुरविण्यासाठी छोट्या उद्योगांची गरज असेल. त्यासाठीच सरकारने एसएमर्इंना बळ देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात एसएमई क्लस्टरची गरज आहे. त्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे.यानिमित्ताने जागतिकस्तरीय पुरवठा साखळीसंदर्भात प्रदर्शनही भरविण्यात आले होते. ओडिशाचे लघुउद्योग मंत्री प्रफुल्ल समळ या वेळी विशेष अतिथी होते. देशाच्या निर्यातीत लघू व मध्यम उद्योगांचा ४० टक्के वाटा व उत्पादन क्षेत्रात ४५ टक्के वाटा आहे. यामुळेच हे क्षेत्र देशाच्या आर्थिक विकासाला मोठा हातभार लावणारे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सातव्या जागतिक आर्थिक परिषदेत अर्थव्यवस्थेचे समृद्ध दर्शन घडेल, असा विश्वास वर्ल्ड ट्रेड सेंटरचे अध्यक्ष कमल मोरारका यांनी या वेळी व्यक्त केला.