नवी दिल्ली : स्पेक्ट्रमचा लिलाव दरवर्षी करण्याच्या मुद्द्यावर सरकार गांभीर्याने विचार करीत आहे, असे दूरसंचार सचिव जे.एस. दीपक यांनी सांगितले.
दीपक यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘स्पेक्ट्रम लिलाव दरवर्षी करण्यासाठी आम्ही दूरसंचार नियामक ट्रायकडून शिफारशी मागविणार आहोत. ट्रायच्या शिफारशी आल्यानंतर सरकार त्यावर विचार करील. दरवर्षी लिलाव ठेवल्याने
ग्राहक नाही मिळाला, तरी त्याची आम्हाला चिंता नाही. या उद्योगाला स्पेक्ट्रम खरेदीची संधी देण्यात आम्हाला अधिक रस आहे.’ गेल्यावर्षी स्पेक्ट्रम लिलावास कमी प्रतिसाद मिळाला होता. किमती जास्त असल्यामुळे असे घडल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरवर्षी स्पेक्ट्रम लिलाव करण्याचा सरकारचा विचार
स्पेक्ट्रमचा लिलाव दरवर्षी करण्याच्या मुद्द्यावर सरकार गांभीर्याने विचार करीत आहे, असे दूरसंचार सचिव जे.एस. दीपक यांनी सांगितले
By admin | Published: March 2, 2017 04:01 AM2017-03-02T04:01:32+5:302017-03-02T04:01:32+5:30