नवी दिल्ली : स्वयंचलितीकरणामुळे नोकºया कमी झाल्या तरी भारतीय अर्थव्यवस्थेला चिंता करण्याचे कारण नाही. कारण अर्थव्यवस्था तेजीत असल्यामुळे नव्या नोकºया निर्माण होत आहेत, असे केंद्र सरकारने म्हटले.
जागतिक बँकेच्या ‘डिजिटल डिव्हिडंड्स’ या अहवालात म्हटले, ‘स्वयंचलितीकरणामुळे भारतातील ६९ टक्के नोकºया धोक्यात आल्या आहेत.’ भारत सरकारने मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, जागतिक बँकेच्या याच अहवालात या मुद्द्याची दुसरी बाजूही मांडण्यात आली आहे. स्वयंचलितीकरणामुळे मोठ्या प्रमाणात नोकºया जाणार असल्या तरी विकसनशील देशांना अल्पकालीन पातळीवर चिंता करण्याचे कारण नाही, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सरकारचाही हाच दृष्टिकोन आहे.
म्हणून कौशल्य विकास कार्यक्रम
मेघवाल यांनी सांगितले की, रोजगारनिर्मितीला नरेंद्र मोदी सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. रोजगारनिर्मिती हेच आर्थिक वृद्धीचे कारण आणि कारक आहे. जनसांख्यिकीय आणि तंत्रज्ञानात्मक बदलांचा परिणामही अंतिमत: आर्थिक वृद्धीतच रूपातंरित होतो. तरुणांची रोजगारक्षमता वाढावी यासाठी २० मंत्रालयांच्या वतीने ७० क्षेत्रांत कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येतो.
स्वयंचलितीकरणामुळे नोकऱ्या गेल्या तरी अर्थव्यवस्थेवर परिणाम नाही, सरकारची राज्यसभेत भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 12:37 AM2017-08-11T00:37:28+5:302017-08-11T00:37:46+5:30