Lokmat Money > बिझनेस न्यूज > महिलांना आजपासून मोदी सरकारकडून मोठं गिफ्ट! पाच हजार रुपयांची 'ही' सुविधा मोफत

महिलांना आजपासून मोदी सरकारकडून मोठं गिफ्ट! पाच हजार रुपयांची 'ही' सुविधा मोफत

Women Self Help Group Members : सामान्यतः अशा सुविधा ज्येष्ठांना दिल्या जात होत्या, मात्र आता या सुविधेमुळे गावातील महिलांनाही कोणाकडे मदत मागावी लागणार नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 02:28 PM2021-12-18T14:28:44+5:302021-12-18T14:29:12+5:30

Women Self Help Group Members : सामान्यतः अशा सुविधा ज्येष्ठांना दिल्या जात होत्या, मात्र आता या सुविधेमुळे गावातील महिलांनाही कोणाकडे मदत मागावी लागणार नाही.

Govt To Launch Overdraft Facility Of Rs 5,000 For Around 5 Crore Women Self Help Group Members | महिलांना आजपासून मोदी सरकारकडून मोठं गिफ्ट! पाच हजार रुपयांची 'ही' सुविधा मोफत

महिलांना आजपासून मोदी सरकारकडून मोठं गिफ्ट! पाच हजार रुपयांची 'ही' सुविधा मोफत

नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार (Narendra Modi Government) आजपासून गावात राहणाऱ्या महिलांसाठी नवीन सेवा सुरू करणार आहे. त्याअंतर्गत आता गरज भासल्यास ग्रामीण महिला कोणत्याही अडचणीशिवाय मिनिटांत पाच हजार रुपयांची व्यवस्था करु शकतील. दरम्यान, ही एक ओव्हरड्राफ्ट सुविधा आहे. या सुविधेमुळे आता महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. सामान्यतः अशा सुविधा ज्येष्ठांना दिल्या जात होत्या, मात्र आता या सुविधेमुळे गावातील महिलांनाही कोणाकडे मदत मागावी लागणार नाही.

कशी मिळणार ही सुविधा?
केंद्र सरकार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या संदर्भात ग्रामीण विकास मंत्रालयाच्या (Ministry of Rural Development) ग्रामीण विकास विभागाचे सचिव नागेंद्र नाथ सिन्हा 18 डिसेंबर 2021 रोजी, दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-NRLM) अंतर्गत, सत्यापित महिला स्वयं-सहायता समूह सदस्यांसाठी पाच हजार रुपयांची ओव्हरड्राफ्ट सुविधेचा शुभारंभ करतील.

या कार्यक्रमात सरकारी बँका आणि राज्य ग्रामीण उपजीविका अभियान सहभागी होणार आहेत. कार्यक्रम व्हर्च्युअल माध्यमातून होणार आहे. या कार्यक्रमात सर्व बँकांचे व्यवस्थापकीय संचालक, उपव्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक आणि मुख्य महाव्यवस्थापक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात राज्य ग्रामीण उपजीविका अभियानाचे (National Rural Livelihood Mission) अधिकारीही सहभागी होणार आहेत.

महिला आपत्कालीन गरजा पूर्ण करू शकतील
2019-20 च्या त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार, सत्यापित स्वयं-सहायता सदस्यांना पाच हजार रुपयांच्या ओव्हरड्राफ्ट सुविधेला परवानगी देण्याबाबत, ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (DAY-) NRLM ने देशातील ग्रामीण भागातील महिला बचत गटांच्या सदस्यांना ओव्हरड्राफ्ट सुविधा प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, जेणेकरून ते त्यांच्या आपत्कालीन गरजा पूर्ण करू शकतील.

5 कोटीहून अधिक महिलांना होईल फायदा
एका अंदाजानुसार, DAY-NRLM अंतर्गत 5 कोटी महिला स्वयं-सहायता गटातील महिला या सुविधेसाठी पात्र असतील. पंतप्रधान मोदी सरकारच्या या योजनेचा देशातील सुमारे 5 कोटी महिलांना थेट फायदा होणार आहे. या कार्यक्रमात सरकारी बँका आणि राज्य ग्रामीण उपजीविका अभियान सहभागी होणार आहेत. कार्यक्रम व्हर्च्युअल माध्यमातून होणार आहे. बँकांचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी/उपव्यवस्थापकीय संचालक, कार्यकारी संचालक, मुख्य महाव्यवस्थापक/महाव्यवस्थापक आणि राज्य ग्रामीण उपजीविका मिशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी/राज्य व्यवस्थापकीय संचालकांनी या कार्यक्रमात भाग घेणे अपेक्षित आहे.

Web Title: Govt To Launch Overdraft Facility Of Rs 5,000 For Around 5 Crore Women Self Help Group Members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला