Join us

जीएसटीतून सरकार श्रीमंत, १५ टक्के वाढ; सणासुदीनंतरही झाले मजबूत संकलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2023 10:52 AM

चालू आर्थिक वर्षात ऑक्टाेबरमध्ये जीएसटी संकलन १.५१ लाख काेटी रुपयांवर झाले हाेते, तर सर्वाधिक संकलन एप्रिल महिन्यात १.६८ लाख काेटी रुपये एवढे हाेते. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारला २०२२ या वर्षातील अखेरच्या महिन्यात भरघाेस उत्पन्न मिळाले आहे. डिसेंबर महिन्यातील वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) संकलन १.४९ लाख काेटी रुपयांहून अधिक राहिले आहे. यात १५ टक्के वाढ नाेंदविण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात ऑक्टाेबरमध्ये जीएसटी संकलन १.५१ लाख काेटी रुपयांवर झाले हाेते, तर सर्वाधिक संकलन एप्रिल महिन्यात १.६८ लाख काेटी रुपये एवढे हाेते. सलग १० महिन्यांपासून जीएसटी संकलन १.४० लाख काेटींहून अधिक राहिले आहे. डिसेंबरमध्ये वस्तूंच्या आयातीतून मिळालेला महसूल ८ टक्के अधिक राहिला. तसेच देशांतर्गत उलाढालीतून मिळालेला महसूल १८ टक्क्यांनी वाढला आहे.

टॅग्स :जीएसटी