Lokmat Money > बिझनेस न्यूज > महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा, सरकार गव्हाचे पीठ प्रतिकिलो ३०; तांदूळ ३४ रुपयांत विकणार

महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा, सरकार गव्हाचे पीठ प्रतिकिलो ३०; तांदूळ ३४ रुपयांत विकणार

Inflation News: महागाईमुळे सर्वसामान्यांची होरपळ सुरूच आहे. सध्या बाजारात गव्हाचे पीठ प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांत मिळत आहे. केंद्र सरकारने 'भारत आटा'च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करीत मंगळवारपासून या पिठाची ३० रुपयांत विक्री सुरू केली आहे. या टप्प्यात तांदूळही प्रतिकिलो ३४ रुपये या दराने विकले जाणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 10:20 AM2024-11-06T10:20:25+5:302024-11-06T10:20:38+5:30

Inflation News: महागाईमुळे सर्वसामान्यांची होरपळ सुरूच आहे. सध्या बाजारात गव्हाचे पीठ प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांत मिळत आहे. केंद्र सरकारने 'भारत आटा'च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करीत मंगळवारपासून या पिठाची ३० रुपयांत विक्री सुरू केली आहे. या टप्प्यात तांदूळही प्रतिकिलो ३४ रुपये या दराने विकले जाणार आहेत.

Govt to provide relief to common people suffering from inflation, wheat flour 30 per kg; Rice will be sold at Rs | महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा, सरकार गव्हाचे पीठ प्रतिकिलो ३०; तांदूळ ३४ रुपयांत विकणार

महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना दिलासा, सरकार गव्हाचे पीठ प्रतिकिलो ३०; तांदूळ ३४ रुपयांत विकणार

नवी दिल्ली - महागाईमुळे सर्वसामान्यांची होरपळ सुरूच आहे. सध्या बाजारात गव्हाचे पीठ प्रतिकिलो ४० ते ५० रुपयांत मिळत आहे. केंद्र सरकारने 'भारत आटा'च्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात करीत मंगळवारपासून या पिठाची ३० रुपयांत विक्री सुरू केली आहे. या टप्प्यात तांदूळही प्रतिकिलो ३४ रुपये या दराने विकले जाणार आहेत. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहारमंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली की, सर्वसामान्यांना रोजच्या आहारात लागणारे तांदूळ, डाळी, गव्हाचे पीठ परवडणाऱ्या दरात मिळावे यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. किरकोळ विक्रीमध्ये सरकारने थेट हस्तक्षेप केल्याने किमती नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळणार आहे. भविष्यात गरज पडल्यास आणखी गहू आणि तांदळाचा पुरवठा सरकारी संस्थांना केला जाणार आहे. 

संस्थांना किती टन गहू आणि तांदूळ दिला?
■ भारत आटाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सरकारने या संस्थांना ३.६९ लाख टन गहू आणि २.९१ लाख टन तांदूळ उपलब्ध करून दिला आहे.
■ पहिल्या टप्प्यासाठी १५.२० लाख टन गहू आणि १४.५८ लाख टन तांदूळ उपलब्ध करून दिला होता.

कुठे विक्री होणार?
ही विक्री केंद्रीय भांडार, राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघांची (एनसीसीएफ) दुकाने तसेच मोबाइल व्हॅनमधून केली जाणार आहे. गव्हाचे पीठ आणि तांदळाची पाच व दहा किलोच्या पाकिटांमध्ये विक्री केली जाईल.

Web Title: Govt to provide relief to common people suffering from inflation, wheat flour 30 per kg; Rice will be sold at Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.