लवकरच आणखी एका कंपनीतील निर्गुंतवणूकीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यासाठी सरकार एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (EOI) जारी करेल. ही भारतातील सर्वात मोठी विमान देखभाल, दुरुस्ती आणि ऑपरेशन्स (MRO) कंपनी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AI Engineering Services Limited) आहे. नागरी विमान वाहतूक सचिव राजीव बन्सल यांनी २१ मार्च रोजी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेडच्या (AI Engineering Services Limited) निर्गुतवणूकीची प्रक्रिया सुरू असून ती लवकरच पूर्ण केली जाणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
काय आहे प्लॅन?
एआयईएसएलकडे एक मजबूत बॅलन्सशीट आहे निर्गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर भारतीय विमान वाहतूक उद्योगांना फायदा होईल, अशी प्रतिक्रिया सीएपीए इंडिया एव्हिएशन समिटमध्ये बोलताना बन्सल यांनी दिली. सध्या भारत व्यावसायिक विमानांच्या उत्पादनासाठी इतर देशांवर अवलंबून आहे. अलीकडेच एअर इंडियानं अमेरिकन कंपनी बोईंगला ४७० विमानांची ऑर्डर दिली आहे.
ही सर्व विमानं युरोप आणि अमेरिकेत बनवली जातील. दुसरीकडे, चीनच्या सरकारी मालकीच्या कमर्शियल एव्हिएशन कॉर्पोरेशन ऑफ चायनानं (COMAC) गेल्या वर्षीच्या अखेरीस प्रथम देशांतर्गत तयार केलेलं व्यावसायिक विमान C919 वितरित केले. कंपनीने जेटसाठी १,२०० ऑर्डर मिळाल्याचा दावा केला आहे.
प्रवाशांची संख्या वाढणार
याशिवाय, देशाच्या विमान वाहतूक क्षेत्राच्या वाढीच्या क्षमतेबद्दल बोलताना बन्सल म्हणाले, "आमच्याकडे सर्व व्यवस्था आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय (क्षेत्र) मध्ये मोठी मागणी आहे." यावेळी त्यांनी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि बंगळूरूच्या विमानतळांचा विस्तार आणि वाढीचाही उल्लेख केला.