Lokmat Money > बिझनेस न्यूज > फसविणाऱ्या ॲप्सवर सरकारची करडी नजर - निर्मला सीतारामन

फसविणाऱ्या ॲप्सवर सरकारची करडी नजर - निर्मला सीतारामन

‘फिनान्शिअल एन्फ्ल्युएंझर्स’ म्हणजेच ‘फिनफ्लुएंझर्स’च्या माहितीवर विसंबून गुंतवणूक करू नका, असेही सीतारामन म्हणाल्या. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 09:44 AM2023-04-25T09:44:15+5:302023-04-25T09:44:43+5:30

‘फिनान्शिअल एन्फ्ल्युएंझर्स’ म्हणजेच ‘फिनफ्लुएंझर्स’च्या माहितीवर विसंबून गुंतवणूक करू नका, असेही सीतारामन म्हणाल्या. 

Govt's Eye on Cheating Apps - Nirmala Sitharaman | फसविणाऱ्या ॲप्सवर सरकारची करडी नजर - निर्मला सीतारामन

फसविणाऱ्या ॲप्सवर सरकारची करडी नजर - निर्मला सीतारामन

बंगळुरू : देशात कार्यरत असलेल्या पोंझी ॲप्सवर सरकारची कडक नजर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी केले. समाजमाध्यमांवरून वित्तीय सल्ला देणाऱ्या ‘फिनान्शिअल एन्फ्ल्युएंझर्स’ म्हणजेच ‘फिनफ्लुएंझर्स’च्या माहितीवर विसंबून गुंतवणूक करू नका, असेही सीतारामन म्हणाल्या. 

बंगळुरूमध्ये ‘थिंकर्स फोरम’च्या एका कार्यक्रमात सीतारामन यांनी सांगितले की, वित्तीय बाबींसंबंधी चुकीची माहिती देणाऱ्या पोंझी ॲप्सवर सरकार बारकाईने नजर ठेवून आहे. या ॲप्सच्या मुसक्या आवळण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्या सहकार्याने काम केले जात आहे. सीतारामन यांनी ‘फिनफ्लुएंझर्स’बाबत सांगितले की, समाजमाध्यमातील १० पैकी ३ ते ४ लोक योग्य वित्तीय सल्ला देणारे असतात. ६ ते ७ लोक मात्र कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन सल्ले देत असतात. त्यामुळे कोणत्याही सल्ल्याची फेरतपासणी करणे आवश्यक आहे. 

Web Title: Govt's Eye on Cheating Apps - Nirmala Sitharaman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.