बंगळुरू : देशात कार्यरत असलेल्या पोंझी ॲप्सवर सरकारची कडक नजर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी केले. समाजमाध्यमांवरून वित्तीय सल्ला देणाऱ्या ‘फिनान्शिअल एन्फ्ल्युएंझर्स’ म्हणजेच ‘फिनफ्लुएंझर्स’च्या माहितीवर विसंबून गुंतवणूक करू नका, असेही सीतारामन म्हणाल्या.
बंगळुरूमध्ये ‘थिंकर्स फोरम’च्या एका कार्यक्रमात सीतारामन यांनी सांगितले की, वित्तीय बाबींसंबंधी चुकीची माहिती देणाऱ्या पोंझी ॲप्सवर सरकार बारकाईने नजर ठेवून आहे. या ॲप्सच्या मुसक्या आवळण्यासाठी सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्या सहकार्याने काम केले जात आहे. सीतारामन यांनी ‘फिनफ्लुएंझर्स’बाबत सांगितले की, समाजमाध्यमातील १० पैकी ३ ते ४ लोक योग्य वित्तीय सल्ला देणारे असतात. ६ ते ७ लोक मात्र कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन सल्ले देत असतात. त्यामुळे कोणत्याही सल्ल्याची फेरतपासणी करणे आवश्यक आहे.