Join us

GPT Healthcare Listing: जीपीटी हेल्थकेअरचे गुंतवणूकदार मालामाल; १६ टक्के प्रीमिअमवर लिस्ट झाला शेअर, नंतर घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 12:15 PM

जीपीटी हेल्थकेअरच्या गुंतवणूकदारांना आज चांगली बातमी मिळाली आहे.

GPT Healthcare IPO Listing: जीपीटी हेल्थकेअरच्या गुंतवणूकदारांना आज चांगली बातमी मिळाली आहे. जीपीटी हेल्थकेअरच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल झालेत. जीपीटी हेल्थकेअरचे शेअर एनएसईवर 215 रुपये प्रति शेअर या दरानं लिस्ट झाले. IPO किमतीच्या तुलनेत शेअर्स 15.6 टक्के प्रीमियमवर लिस्ट झाले. आयपीओमध्ये शेअर्सची इश्यू प्राईज 186 रुपये प्रति शेअर होती. परंतु लिस्टिंग नंतर शेअर्समध्ये थोडी घसरण दिसून आली. 

जीपीटी हेल्थकेअरचे शेअर्स आज बीएसईवर 216.15 रुपये प्रति शेअर या दरानं लिस्ट झाले आहेत आणि दरम्यान, इश्यू प्राईजपेक्षा अधिक लिस्टिंग गेन देण्यात यशस्वी ठरलेत. कंपनीचे शेअर्स बीएसईवर 16.21 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाले आहेत. 

गुंतवणूकदारांना मोठा नफा 

आयपीओदरम्यान गुंतवणूकदारांना 186 रुपयांना शेअर्स अलॉट झाले आणि कंपनीच्या शेअर्सचं लिस्टिंग 215 रुपयांवर झालंय. प्रत्येक शेअरमागे गुंतवणूकदारांना 29 रुपयांचा नफा मिळालाय. अलॉटमेंटमध्ये प्रत्येक गुंतवणूकदारांना 80 शेअर्सचा एक लॉट मिळाला होता. 80 शेअर्सवर 29 रुपये प्रति शेअर्सप्रमाणे नफा मोजला तर तो 2320 रुपये लिस्टिंगदरम्यानच मिळाला आहे. 

कसा होता रिस्पॉन्स? 

जीपीटी हेल्थकेअरच्या आयपीओला उत्तम रिस्पॉन्स मिळाला होता. बीएसईवर जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार हा शेअर 8.52 पट सबस्क्राईब झाला होता.(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारशेअर बाजार