C2C Advanced Systems Limited Listing: सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडची शेअर बाजारात ग्रँड लिस्टिंग झाली. कंपनीच्या शेअर्सनं पहिल्याच दिवशी अपर सर्किटला धडक दिली. ज्यामुळे शेअर्सच्या किंमतीत इश्यू प्राइसपेक्षा १०० टक्क्यांनी वाढली आहे. आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे पहिल्याच दिवशी दुप्पट झालेत. एनएसई एसएमईवर कंपनीची लिस्टिंग ९० टक्क्यांच्या प्रीमियमवर ४२९.४० रुपये प्रति शेअरवर झाली. अल्पावधीतच कंपनीच्या शेअर्सना अपर सर्किट लागलं. अपर सर्किटनंतर एनएसईवर कंपनीच्या शेअरचा भाव ४५०.८५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला.
२२ नोव्हेंबरला उघडलेला आयपीओ
सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडचा आयपीओ २२ नोव्हेंबर रोजी किरकोळ गुंतवणूकदारांच्या सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला. किरकोळ गुंतवणूकदारांना २६ नोव्हेंबरपर्यंत कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी होती. कंपनीनं आयपीओसाठी प्रति शेअर २१४ ते २२६ रुपये प्राइस बँड निश्चित केला होता. एका लॉटमध्ये कंपनीचे ६०० शेअर्स होते. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान १ लाख ३५ हजार ६०० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार होती. सीटूसी अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेडच्या आयपीओची साईज ९९.०७ कोटी रुपये होती. कंपनीनं आयपीओच्या माध्यमातून ४३.८४ लाख नवे शेअर्स जारी केलेत.
हा आयपीओ २१ नोव्हेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला करण्यात आला. कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून २८.२३ कोटी रुपये उभे केले. अँकर गुंतवणूकदारांना देण्यात येणाऱ्या ५० टक्के शेअर्ससाठी ३० दिवसांचा लॉक-इन पीरिअड आहे.
१२५ टक्क्यांपेक्षा अधिक सबस्क्राईब
आयपीओला ३ दिवसांत १२५ पटींपेक्षा अधिक सब्सक्रिप्शन मिळालं आहे. रिटेल कॅटेगरीमध्ये १३२.७३ पट, तर नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स कॅटेगरीत २३३.१३ पट आयपीओ सब्सक्राइब झाला. सर्वात कमी ३१.६१ पट सबस्क्रिप्शन क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स कॅटेगरीत मिळालं.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)