LIC: तुम्ही भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) चे कर्मचारी किंवा एजंट असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. केंद्र सरकारने (Finance Ministry) एलआयसीच्याकर्मचारी आणि एजंटसाठी अनेक फायदे जाहीर केले आहेत. यामध्ये ग्रॅच्युइटी मर्यादेत वाढ, एजंट रिन्यूएबल कमिशन, टर्म इन्शुरन्स कव्हर आणि फॅमिली पेन्शनचा समावेश आहे.
13 लाख एलआयसी एजंट्सना फायदा
अर्थ मंत्रालयाने ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे. एलआयसी एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी कल्याणकारी उपायांना मंत्रालयाने मंजुरी दिली असल्याचे लिहिले आहे. याचा फायदा कंपनीच्या एक लाखाहून अधिक नियमित कर्मचारी आणि 13 लाखांहून अधिक एजंट्सना होणार आहे. याबाबत एलआयसीने म्हटले की, हे एजंट आणि कर्मचारीच आहेत, ज्यांनी कंपनीच्या वाढीमध्ये आणि भारतात विमा क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अर्थ मंत्रालयाने ही घोषणा केली
👉 Ministry of Finance @FinMinIndia approves welfare measures for LIC agents and employees @LICIndiaForever
— Ministry of Finance (@FinMinIndia) September 18, 2023
👉 Welfare measures include:
✅ Increase in gratuity limit
✅ Eligibility for renewal commission
✅ Term insurance cover, and
✅ Uniform rate of family pension for LIC… pic.twitter.com/tEzLiQPMsq
पहिली घोषणा
सोमवारी अर्थ मंत्रालयाने एका ट्विट केलेल्या अधिसूचनेत, एलआयसी एजंट आणि कर्मचार्यांसाठी केलेल्या फायदेशीर उपायांबद्दल तपशीलवार माहिती दिली हे. यानुसार, एलआयसी एजंटसाठी ग्रॅच्युइटीची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे. या निर्णयामुळे कंपनीच्या एजंटच्या परिस्थितीत सुधारणा होऊन त्यांना अधिक लाभ मिळणार आहेत.
दुसरी घोषणा
एलआयसी एजंट्सची ग्रॅच्युइटी मर्यादा वाढवण्यासोबतच सरकारने त्यांना आणखी एक फायदा दिला आहे. अधिसूचनेनुसार, जे एजंट्स नियुक्तीनंतर पुन्हा येतील, त्यांना रीन्यूअल कमीशनसाठी पात्र बनवण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे त्यांना आर्थिक स्थिरता मिळेल. सध्या LIC एजंट कोणत्याही जुन्या एजन्सी अंतर्गत पूर्ण झालेल्या व्यवसायाच्या अक्षय कमिशनसाठी पात्र नाहीत.
तिसरी घोषणा
सरकारने एलआयसी एजंट्ससाठी टर्म इन्शुरन्स कव्हर वाढवण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत त्याची श्रेणी 3000-10,000 रुपयांवरून 25,000-1,50,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. याद्वारे सरकारने एलआयसीमध्ये एजंट म्हणून काम करणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांना आर्थिक सुरक्षेची हमी देण्याचे काम केले आहे.
चौथी घोषणा
एलआयसी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेत सरकारने एलआयसी कर्मचाऱ्यांना 30 टक्के समान दराने कौटुंबिक पेन्शनचा लाभ देण्याची घोषणा केली आहे. मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले आहे की, हे कल्याणकारी उपाय एलआयसी एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरतील आणि त्यांच्या कामात सुधारणा होईल.