मुंबई : भारत इंटरफेस फॉर मनी (भीम) हे अॅप आता अॅपल अॅप स्टोअर्सवर उपलब्ध झाले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने (एनपीसीआय) ही माहिती दिली. अॅपल अॅप स्टोअर्सवरून हे अॅप डाऊनलोड करता येईल. पेटीएमचा प्रतिस्पर्धी म्हणून हे अॅप आता पुढे येत आहे.
भीम अॅप हे आता आयओएस (अॅपलची मोबाईल आॅपरेटिंग सिस्टिम) प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल. आयओएस प्लॅटफॉर्मवर हे अॅप उपलब्ध झाल्यामुळे आता देशातील १०० टक्के स्मार्टफोनधारक हे अॅप वापरू शकतील.
आॅनलाइन देवाणघेवाणीच्या व्यवहारासाठी याचा उपयोग होणार आहे, अशी माहिती एनपीसीआयचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. बी. होता यांनी दिली. या अॅपमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषेचा उपयोग करता येईल. मुख्य म्हणजे अॅप हिंदीतूनही उपलब्ध असल्याने इंग्रजी न येणाऱ्यांनाही त्याचा सहज वापर करता येईल. भीम अॅप हे स्मार्ट फोनवर आधारित अॅप असून, पैशांचे देवाण-घेवाणीचे व्यवहार अधिक सोपे करण्याचा यामागचा हेतू आहे.
नोटाबंदीच्या निर्णयानंतर सरकारकडून कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘भीम अॅप’ची घोषणा केली होती. सर्वसामान्यांसाठी सोप्या आणि सुटसुटीत भाषेत यात फिचर्स देण्यात आले आहेत. हे अॅप दाखल झाल्यानंतर काही दिवसांतच लाखो नागरिकांनी हे अॅप डाऊनलोड
केले आहे.
आता आयओएस प्लॅटफॉर्मवर हे अॅप उपलब्ध झाल्यामुळे या अॅपच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवेच्या कक्षा रुंदावल्या आहेत. (वाणिज्य प्रतिनिधी)
आता स्मार्टफोनवरही भीम अॅप उपलब्ध!
भारत इंटरफेस फॉर मनी (भीम) हे अॅप आता अॅपल अॅप स्टोअर्सवर उपलब्ध झाले आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन आॅफ इंडियाने (एनपीसीआय) ही माहिती
By admin | Published: February 14, 2017 12:28 AM2017-02-14T00:28:19+5:302017-02-14T00:28:19+5:30