Join us

जबरदस्त ! 148 रुपयांमध्ये ही कंपनी देतेय 70 जीबी डेटा

By admin | Published: May 01, 2017 9:58 PM

आर कॉम 148 रुपयांमध्ये पहिला रिचार्ज प्लॅन लाँच करणार आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 1 - अनिल अंबानी यांची रिलायन्स कम्युनिकेशन ही कंपनी नवा प्लॅन आणण्याच्या तयारीत आहे. या प्लॅनची माहिती रिटेलर्सलाही देण्यात आली आहे. आंध्र प्रदेश सर्कलमधल्या काही रिटेलर्सच्या मते, आर कॉम 148 रुपयांमध्ये पहिला रिचार्ज प्लॅन लाँच करणार आहे. 148 रुपयांचं पहिल्यांदा रिचार्ज करणा-या ग्राहकाला 70 दिवसांच्या वैधतेसह दररोज 1 जीबी डेटा मिळणार आहे. मात्र या प्लॅन अंतर्गत कोणत्याही कॉलिंगची सुविधा मोफत मिळणार नाही. नव्या ग्राहकांसाठी कॉलिंगचा रेट 25 पैसे प्रतिमिनिट राहणार आहे. या प्लॅनअंतर्गत तुम्हाला 50 रुपयांच्या टॉकटाइमही मिळणार आहे. सध्या तरी हा प्लॅन तेलंगणा आणि आंध्र प्रदेश सर्कलसाठी उपलब्ध आहे. 148 रुपयांचा हा प्लॅन लाँच करण्याआधी कंपनीनं दोन नवे प्लॅन ग्राहकांच्या सेवेत आणले आहेत. पहिला प्लॅन हा 54 रुपयांचा आहे, तर दुसरा प्लॅन हा 61 रुपयांचा आहे. 54 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी 28 जीबी 4जी डेटा मिळणार आहे. तसेच रिलायन्सच्या नेटवर्कवरही 10 पैसे प्रति मिनिट हा कॉलिंगचा दर असणार आहे. तर इतर नेटवर्कवर कॉलिंगसाठी 25 पैसे प्रतिमिनिट मोजावे लागणार आहेत. 61 रुपयांच्या प्लॅनवरही 28 दिवसांसाठी 28 जीबी 4जी डेटाच मिळणार आहे. मात्र यात रिलायन्स टू रिलायन्स कॉलिंगसाठी प्रति 6 सेकंदांना 1 पैसा दर आकारला जाणार आहे. इतर नेटवर्कवर प्रति 2 सेकंदांसाठी 1 पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र तिन्ही प्लॅनचा फक्त नव्या ग्राहकांना लाभ मिळणार आहे. यापूर्वी आयडियानंही असाच 499 रुपयांचा प्लॅन ग्राहकांसाठी आणला आहे. ज्यात 70 दिवसांसाठी 105 जीबी डेटा देण्यात येणार आहे. यात प्रतिदिवस 1.5 जीबी डेटा मिळतो आहे. विशेष म्हणजे यात आयडिया टू आयडिया नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देण्यात आलं आहे. तर दुस-या नेटवर्कवर 3,000 मिनिट कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. हा प्लॅनसुद्धा 70 दिवसांसाठी वैध आहे.