Join us  

Investment: गुंतवणुकीची मोठी संधी; ९७ आयपीओ येणार, कंपन्या गोळा करणार २.२५ लाख कोटी रुपये  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2022 7:46 AM

Investment News: २०२१-२२ मध्ये जोरदार कामगिरीनंतर आयपीओ बाजारात येणाऱ्या आर्थिक वर्षातही मोठी वाढ पाहायला मिळणार आहे. पुढील आर्थिक वर्षात तब्बल ९७ कंपन्या आयपीओच्या माध्यमातून २.२५ लाख कोटी रुपये बाजारातून गोळा करण्याच्या तयारीत आहेत.

मुंबई : २०२१-२२ मध्ये जोरदार कामगिरीनंतर आयपीओ बाजारात येणाऱ्या आर्थिक वर्षातही मोठी वाढ पाहायला मिळणार आहे. पुढील आर्थिक वर्षात तब्बल ९७ कंपन्या आयपीओच्या माध्यमातून २.२५ लाख कोटी रुपये बाजारातून गोळा करण्याच्या तयारीत आहेत.आतापर्यंत एलआयसीसह इतर ४३ कंपन्यांना बाजार नियामक सेबीने आयपीओसाठी मंजुरी दिली असून, आणखी ४३ कंपन्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या ५४ कंपन्या एकूण १.४० लाख कोटी रुपये गोळा करणार असून, ८१ हजार कोटी रुपयांसाठीचे ४३ आयपीओंचे अर्ज सेबीकडे आले आहेत. त्यांनाही सेबी लवकरच मंजुरी देण्याची शक्यता आहे. कंपन्या वाढती महागाई, व्याजदर वाढण्याचा परिणाम आणि रशिया-युक्रेन युद्ध संकटामुळे शेअर बाजारात आलेला चढउतार शांत होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. परिस्थिती निवळल्यानंतर आयपीओ सादर करण्यात येणार आहेत. आयपीओ सादर केल्याने कंपन्यांना आपले उत्पादन विस्तारण्याची मोठी संधी मिळते.

कंपनी आयपीओ आकार (कोटी रुपयांत)३,६००कंपनी आयपीओ आकार (कोटी रुपयांत)एलआयसी ६५,०००ओयो रुम्स ८,४३०डेलिव्हरी ७,४६०एपीआय होल्डिंग्स ६,२५०भारत एफआयएच ५,००३एमक्यूअर फार्मा ४,०००गो एअरलाइन्स ३,६००फाइव्ह स्टार फायनान्स २,७५२जेमिनी इडिबल्स २,५००पारादीप फॉस्फेट्स २,२०

टॅग्स :गुंतवणूकपैसाव्यवसाय