Join us  

वर्षाच्या पहिल्या दिवशी मोठी आनंदाची बातमी! विमान प्रवास स्वस्त होऊ शकतो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 9:09 AM

वर्षाच्या पहिल्याच दिवशी चांगली बातमी आली आहे. तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या महिन्यात जेट इंधनाच्या किमती कमी केल्या आहेत.

वर्षाच्या पहिल्याच दिवशीच चांगली बातमी आली आहे. विमान प्रवासात मोठा प्रवाशंना मोठा दिलासा मिळणार आहे. तेल कंपन्यांनी सलग तिसऱ्या महिन्यात जेट इंधनाच्या किमतीत कपात केली आहे. नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत जेट इंधनाच्या किमतीत सुमारे १४ टक्क्यांनी घट झाली आहे. तर केवळ १ जानेवारी रोजी तेल कंपन्यांनी जेट इंधनाच्या किमतीत सुमारे ४ टक्क्यांनी कपात केली आहे. 

ग्राहकांना दिलासा! नववर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलेंडरच्या दरात कपात 

आयओसीएलच्या वेबसाइटनुसार, देशाची राजधानी दिल्लीत जेट इंधनाच्या किमतीत सुमारे ४ टक्के म्हणजेच ४,१६२.५ रुपये प्रति किलोलीटरची घसरण झाली आहे. त्यानंतर दिल्लीत जेट इंधनाची किंमत १,०१,९९३.१७ रुपये प्रति किलोलिटरवर आली आहे. कोलकातामध्ये जेट इंधनाची किंमत १,१०,९६२.८३ रुपये प्रति किलोलीटर आहे, मुंबईत ती ९५,३७२.४३ रुपये प्रति किलोलीटर आहे आणि चेन्नईमध्ये जेट इंधनाची किंमत १,०६,०४२.९९ रुपये प्रति किलोलीटर आहे.

दुसरीकडे, तीन महिन्यांत जेट इंधनाच्या किमतीत मोठी घट झाली आहे. जेट इंधनाच्या किमतीत शेवटची वाढ ऑक्टोबर महिन्यात झाली होती आणि दिल्लीत जेट इंधनाची किंमत १,१८,१९९.१७ रुपयांवर आली होती. नोव्हेंबर महिन्यात ५.७९ टक्के म्हणजेच ६,८५४.२५ रुपयांची घसरण झाली आणि किंमत १,११,३४४.९२ रुपयांवर आली. त्यानंतर, डिसेंबर महिन्यातही दिल्लीतील जेट इंधनाच्या किमतीत ४.६६ टक्के म्हणजेच ५,१८९.२५ रुपये प्रति किलोलीटरची घसरण दिसून आली आणि किंमत १,०६,१५५.६७ रुपये प्रति किलोलीटरवर आली. याचा अर्थ असा की तीन महिन्यांत जेट इंधनाच्या किमतीत सुमारे १४ टक्के म्हणजेच १६,२०६ रुपये प्रति किलोलिटर घट झाली आहे.

टॅग्स :विमान