Lokmat Money > बिझनेस न्यूज > ग्रीस, चीनने दिला बाजाराला धक्का; वाढीला ब्रेक

ग्रीस, चीनने दिला बाजाराला धक्का; वाढीला ब्रेक

ग्रीसमधील सार्वमतानंतर तेथील आर्थिक संकट संपण्याची चिन्हे नसतानाच चीनमधील शेअर बाजाराने आपटी खाल्ल्याचे निमित्त भारतीय बाजाराला मिळाले

By admin | Published: July 13, 2015 12:02 AM2015-07-13T00:02:15+5:302015-07-13T00:02:15+5:30

ग्रीसमधील सार्वमतानंतर तेथील आर्थिक संकट संपण्याची चिन्हे नसतानाच चीनमधील शेअर बाजाराने आपटी खाल्ल्याचे निमित्त भारतीय बाजाराला मिळाले

Greece, China push market up; Break breaks | ग्रीस, चीनने दिला बाजाराला धक्का; वाढीला ब्रेक

ग्रीस, चीनने दिला बाजाराला धक्का; वाढीला ब्रेक

प्रसाद गो. जोशी
ग्रीसमधील सार्वमतानंतर तेथील आर्थिक संकट संपण्याची चिन्हे नसतानाच चीनमधील शेअर बाजाराने आपटी खाल्ल्याचे निमित्त भारतीय बाजाराला मिळाले आणि तीन आठवड्यांची वाढीची इनिंग बाजाराने थांबविली. सप्ताहाच्या अखेरीस जाहीर झालेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाचा बाजारावरील परिणाम अद्याप दिसणे बाकी आहे.
सलग तीन सप्ताहांच्या वाढीनंतर मुंबई शेअर बाजारामध्ये करेक्शन येण्याची अपेक्षा होतीच. त्यातच जगभरातील शेअर बाजारांमध्ये काहीशी मरगळ असल्याने त्याचा परिणामही भारतीय बाजारावर झाला. ग्रीसमधील आर्थिक संकट कायम असतानाच चीनच्या शेअर बाजारामध्येही भूकंप झाल्याने त्याची झळ भारताला सोसावी लागली. परिणामी बाजार खाली आला.
सप्ताहात मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक २८३३५.२३ ते २७५३०.९० अंशांदरम्यान हेलकावत होता. सप्ताहाच्या अखेरीस तो २७६६१.४० अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये १.५४ टक्के म्हणजे ४३१.३९ अंशांची घट झाली. बाजार २८००० अंशांच्या काली आल्याने गुंतवणुकदार काहीसे धास्तावले आहेत. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) १.४७ टक्कयांनी घसरल्याने तो ८४०० अंशांखाली आला. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ८३६०.५५ अंशांवर बंद झाला. मागील सप्ताहापेक्षा त्यामध्ये १२४.३५ अंशांनी घट झाली. याआधीच्या तीन सप्ताहांमध्ये निर्देशांकांमध्ये सुमारे ६.३० टक्के वाढ झालेली आहे.
दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या ग्रीसने सार्वमताद्वारे युरोपियन युनियनने दिलेला प्रस्ताव फेटाळल्यानंतर आता पुन्हा काही प्रयत्न होत आहेत. युरोपियन युनियनने गीसला आता अखेरची मुदत दिली आहे. याबात काय निर्णय होणार त्यावर बाजाराची पुढची वाटचाल अवलंबून आहे. चीनमधील शेअर बाजाराला बुधवारी मोठा फटका बसला. या एका दिवसात चीनी बाजार सुमारे ६.५ टक्क्यांनी घसरला. चीन सरकारने बाजार सावरण्यासाठी सर्व ते प्रयत्न केल्यावरही बाजारात एवढी घसरण झाली. या घसरणीमुळे अन्य आशियाई बाजारही खाली आले.



 

Web Title: Greece, China push market up; Break breaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.