Lokmat Money > बिझनेस न्यूज > वर्षभरात वाढल्या रिअल इस्टेटच्या अडचणी !

वर्षभरात वाढल्या रिअल इस्टेटच्या अडचणी !

देशाच्या विविध शहरांत विक्री न झालेली निवासी घरे आणि व्यावसायिक दुकाने यांची संख्या वाढत चालली आहे. ही बाब पाहता, रिअल इस्टेट क्षेत्रासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

By admin | Published: May 9, 2016 03:06 AM2016-05-09T03:06:09+5:302016-05-09T03:06:09+5:30

देशाच्या विविध शहरांत विक्री न झालेली निवासी घरे आणि व्यावसायिक दुकाने यांची संख्या वाढत चालली आहे. ही बाब पाहता, रिअल इस्टेट क्षेत्रासमोरील अडचणी वाढल्या आहेत.

Growing real estate problems in a year! | वर्षभरात वाढल्या रिअल इस्टेटच्या अडचणी !

वर्षभरात वाढल्या रिअल इस्टेटच्या अडचणी !

देशाच्या विविध शहरांत विक्री न झालेली निवासी घरे आणि व्यावसायिक दुकाने यांची संख्या वाढत चालली आहे. ही बाब पाहता, रिअल इस्टेट क्षेत्रासमोरील अडचणी वाढल्या आहेत. असोचेम या औद्योगिक व व्यावसायिक संघटनेतर्फे ही माहिती देण्यात आली. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात (एनसीआर) दिल्लीत ही स्थिती सर्वाधिक गंभीर आहे. त्यामुळे वित्तीय सेवा लोखंडासह अन्य अनेक क्षेत्रांवर विपरीत परिणाम झाला आहे.
घरांच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत; शिवाय व्याजदरही कमी झाले आहेत. असे असूनही गेल्या एका वर्षात दिल्लीत निवासी घरांची मागणी
25-30
टक्क्यांनी, तर दुकानांची मागणी 35-40
> असोचेमने म्हटले आहे की,
एनसीआर दिल्लीत अडीच लाख ठिकाणी घरांची विक्री झालेली नाही. त्यातील मंजुरी न मिळालेल्या आणि न्यायालयीन प्रकरणात अडकलेल्या घरांचे प्रमाण 35% विकासक आणि ग्राहक या दोघांसाठीही सध्याची स्थिती कठीण आहे. त्यामुळे त्यावर तोडगा काढण्यासाठी संबंधित अधिकारी, विकासक, बँका, ग्राहक यांना संयुक्त प्रयत्न करावे लागतील.
या क्षेत्रात १ कोटी २० लाख मजूर काम करतात. त्यांच्यावरही या परिस्थितीचा परिणाम झाल्याचे असोचेमचे म्हणणे आहे.

Web Title: Growing real estate problems in a year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.