वॉशिंग्टन : वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यास मध्यम अवधीत भारताच्या आर्थिक वृद्धीला गती मिळेल, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. भारताने सुधारणांच्या आघाडीवर प्रगती दर्शविली आहे. त्यामुळे व्यापारातही उल्लेखनीय सुधारणा होईल.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आशिया-प्रशांत क्षेत्रातील आर्थिक स्थितीवर एक ताजा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली. अहवालात म्हटले काही, भारताने २0१६ मध्ये सुधारणांच्या बाबतीत जी पावले उचलली ती स्वागत करण्याजोगीच आहे. हे चालू राहायला हवे. वस्तू व सेवा कर लागू झाल्यामुळे भारताला मध्यम अवधीत आर्थिक वृद्धी मजबूत करण्यात मदत मिळेल. रोजगार निर्मिती आणि वृद्धीला गती देण्यासाठी श्रम बाजारात लवचितका आणि उत्पादन बाजारात स्पर्धा असणे आवश्यक आहे. नव्या कंपन्यांसाठी कर्जाचे पुनर्गठन प्राधान्याने व्हायला हवे.
नाणेनिधीने म्हटले की, भारताने सुधारणांच्या बाबती जी प्रगमी दाखविली ती उल्लेखनीय आहे. व्यापारी गुंतवणुकीसाठी तिचा लाभ होईल. गुंतवणूक वाढेल. मजबूत एफडीआय प्रभावातून हा लाभ दिसूही लागला आहे. देशांतर्गत मागणी मजबूत होण्यासही मदत होईल. मजबूत आर्थिक वृद्धी कायम ठेवण्यास हे फायदेशील ठरेल. (वृत्तसंस्था)
>सध्याच्या विकास दरात होईल सुधारणा
नाणेनिधीचा अहवाल म्हणतो की, २0१६-१७ या आर्थिक वर्षात भारताचा वृद्धी दर ७.६ टक्के राहण्याचा अंदाज आहे. २0१६ च्या जागतिक परिदृश्याच्या तुलनेत हा दर 0.१ टक्का अधिक आहे. सध्याच्या वृद्धीमध्ये सुधारणा होत राहील.
त्यातून वैयक्तिक मागणी वाढण्यास मदत होईल. यंदा मान्सून चांगला राहिल्यामुळे कृषी क्षेत्राला लाभ होईल. सरकारी कर्मचाऱ्यांना सातव वेतन आयोग मिळाल्यामुळे देशांतर्गत मागणी वाढण्यास मदत होईल. त्यातून आर्थिक वृद्धी आणखी मजबूत होईल.
जीएसटीमुळे वृद्धीला गती
वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यास मध्यम अवधीत भारताच्या आर्थिक वृद्धीला गती मिळेल
By admin | Published: October 8, 2016 03:49 AM2016-10-08T03:49:33+5:302016-10-08T03:49:33+5:30