आॅगस्ट : वृद्धीदर २.६ टक्के; पोलाद उत्पादनात घट
नवी दिल्ली : पायाभूत क्षेत्राची गती मंदावली असून, पोलाद उत्पादन घटल्याने पायाभूत उद्योगाचा वृद्धीदर आॅगस्ट महिन्यात २.६ टक्क्यांवर आला. मागच्या वर्षी याच अवधीत या क्षेत्राचा वृद्धी दर ५.९ टक्के होता.
जुलैच्या तुलनेत आॅगस्ट महिन्यातील वृद्धीदर अधिक आहे. औद्योगिक उत्पादनात पायाभूत उद्योगांचा भारांश ३८ टक्के आहे. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आॅगस्टमध्ये पोलाद उत्पादन ५.९ टक्क्यांनी घटले. तसेच कोळसा, सिमेंट, वीजनिर्मितीच्या वृद्धीत घट झाली.
तथापि, कच्चे तेल, नैसर्गिक वायू, रिफायनरी आणि खत उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. यावर्षी मार्च आणि एप्रिलमध्ये आठ प्रमुख पायाभूत उद्योगांचे उत्पादन क्रमश: ०.१ आणि ०.४ टक्क्याने घटले होते. चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते आॅगस्ट या अवधीत पायाभूत उद्योगांचा वृद्धीदर २.२ टक्के राहिला.
पायाभूत उद्योगांची गती मंदावली
पायाभूत क्षेत्राची गती मंदावली असून, पोलाद उत्पादन घटल्याने पायाभूत उद्योगाचा वृद्धीदर आॅगस्ट महिन्यात २.६ टक्क्यांवर आला.
By admin | Published: October 1, 2015 12:01 AM2015-10-01T00:01:59+5:302015-10-01T00:01:59+5:30