नवी दिल्ली - डिसेंबर महिन्यात वस्तू उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) क्षेत्रातील हालचाली वाढून पाच वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. निक्की इंडियाचा मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स (पीएमआय) डिसेंबरमध्ये वाढून ५४.७ झाला. नोव्हेंबरमध्ये तो ५२.६ होता.मार्च २००५मध्ये पीएमआय मोजण्यास सुरुवात झाली. त्याची आजपर्यंतची सरासरी ५४.० आहे. डिसेंबरमध्ये तो सरासरीपेक्षा किंचित जास्त राहिला. २०१२नंतर प्रथमच नवीन व्यवसाय आणि रोजगार निर्मितीतही सर्वाधिक वाढ दिसून येत आहे. एप्रिलनंतर कच्चा माल सर्वाधिक महाग झाला आहे. कंपन्यांनी आपल्या मालाची विक्री किंमत फेब्रुवारीनंतर सर्वाधिक वेगाने वाढविली आहे, असे सर्वेक्षणात आढळून आले आहे. देशातील ४०० औद्योगिक कंपन्यांच्या खरेदी अधिकाºयांना पाठविलेल्या प्रश्नावलीतून मिळणाºया उत्तराच्या आधारे निक्की इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय काढला जातो. कोळसा, स्टील, कच्चे तेल, रिफायनरी उत्पादने, सिमेंट, खते आणि वीज या गाभा क्षेत्रात नोव्हेंबरमध्ये ६.८ टक्के वाढ दिसून आली.अनेक काळ ठप्प होते हे क्षेत्रसूत्रांनी सांगितले की, ८ नोव्हेंबर २०१६ रोजी सरकारने नोटाबंदी जाहीर केली होती. त्यानंतर जवळपास सहा महिने अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. त्यानंतर १ जुलै रोजी जीएसटी लागू करण्यात आला. आधीचा मालसाठा संपविण्यावर उद्योगांनी भर दिल्यामुळे जीएसटीच्या आधी काही महिने उत्पादन ठप्प होते. त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील घडामोडी मंदावल्या होत्या. त्यानंतर आता उत्पादन वाढल्याचे निक्की इंडियाच्या सर्वेक्षणातून दिसून येत आहे.
उत्पादन क्षेत्राची वृद्धी पाच वर्षांच्या उच्चांकावर, व्यवसायात झाली वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 12:35 AM