Lokmat Money > बिझनेस न्यूज > विकासदर घटला असला; तरी अर्थव्यवस्थेत मात्र मंदी नाही - वित्तमंत्री सीतारामन

विकासदर घटला असला; तरी अर्थव्यवस्थेत मात्र मंदी नाही - वित्तमंत्री सीतारामन

देशाच्या आर्थिक विकासाचा दर कमी झाला असला तरी अर्थव्यवस्थेत मंदी नाही व मंदी येऊही शकत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 04:10 AM2019-11-28T04:10:05+5:302019-11-28T04:19:07+5:30

देशाच्या आर्थिक विकासाचा दर कमी झाला असला तरी अर्थव्यवस्थेत मंदी नाही व मंदी येऊही शकत नाही

Growth rate may have declined; However, there is no downturn in the economy, Finance Minister Sitharaman said in the Rajya Sabha | विकासदर घटला असला; तरी अर्थव्यवस्थेत मात्र मंदी नाही - वित्तमंत्री सीतारामन

विकासदर घटला असला; तरी अर्थव्यवस्थेत मात्र मंदी नाही - वित्तमंत्री सीतारामन

नवी दिल्ली : देशाच्या आर्थिक विकासाचा दर कमी झाला असला तरी अर्थव्यवस्थेत मंदी नाही व मंदी येऊही शकत नाही, असे ठाम प्रतिपादन करून केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीविषयी व्यक्त होणारी चिंता दूर करण्याचा बुधवारी प्रयत्न केला.

राज्यसभेत हे प्रतिपादन करताना सीतारामन यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील ‘संपुआ-२’ सरकारचा २००९ ते २०१४ हा कालखंड व मोदी सरकारचे २०१४ ते २०१९ हे पहिले पर्व यांची तुलना करत सांगितले की, मोदी सरकारच्या काळात चलनवाढीचा दर कमी व विकासाचा दर जास्त
राहिला. मोदी शासनाच्या पहिल्या पाच वर्षांत थेट परकीय
गुंतवणूक १८९.५ अब्ज डॉलर एवढी झाली तर परकीय चलनाची गंगाजळी वाढून ४१२.६ अब्ज डॉलरवर पोहोचली. या तुलनेत ‘संपुआ-२’च्या काळातील हे आकडे अनुक्रमे २८३.९ अब्ज डॉलर व ३०४.२ अब्ज डॉलर इतके होते.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कालखंडातील यंदाचा पहिला अर्थसंकल्प आपण सादर केल्यानंतर योजलेल्या उपायांची फलनिष्पत्ती दिसत असून वाहन उद्योगासह काही क्षेत्रांमध्ये पुन्हा जान येत असल्याची लक्षणे दिसू लागली आहेत, असे सांगून त्या म्हणाल्या की, सरकारच्या करवसुलीच्या बाबतीतही काळजी कारण्याचे काही कारण नाही, गेल्या वर्षीच्या पहिल्या सात महिन्यांच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या सात महिन्यांत प्रत्यक्ष कर व ‘जीएसटी’चा महसूल वाढला आहे.

काँग्रेसचा सभात्याग

सीतारामन यांनी केलेल्या निवेदनावर असमाधान व निषेध नोंदवत काँग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. देश मोठ्या वित्तीय संकटाच्या दिशेने वाटचाल करत आहे व लोकांना दैनंदिन गरजेच्या वस्तूही घेणे परवडेनासे झाले आहे, असे म्हणत इतर विरोधी पक्षांनीही सरकारवर हल्लाबोल केला.
 

Web Title: Growth rate may have declined; However, there is no downturn in the economy, Finance Minister Sitharaman said in the Rajya Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.