रिझर्व्ह बॅँकेने कोरोनामुळे अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी जाहीर केलेल्या दुसºया पॅकेजमुळे शेअर बाजारात काहीशी जान आणली असली तरी बाजारातील व्यवहारांची मर्यादित संख्या आणि अस्थिरता कायम आहे. रिझर्व्ह बॅँकेने दिलेल्या पॅकेजमुळे हा सप्ताह चांगला राहिला आणि सलग दुसºया सप्ताहात निर्देशांक वाढीव पातळीवर बंद झालेले दिसून आले.
मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने सप्ताहाचा प्रारंभ वाढीने केला असला तरी बाजार वर-खाली होताना दिसून आला. रिझर्व्ह बॅँकेने दिलेल्या सवलतींमुळे बाजारात काही प्रमाणात जान आणली असली तरी अस्थिर जागतिक परिस्थितीमुळे बाजारात अस्थिरता कायम राहण्याची चिन्हे दिसत
आहेत.
परकीय तसेच देशांतर्गत वित्तसंस्थांनी गत सप्ताहामध्ये मोठी विक्री केली आहे. मुख्यत: रोख्यांमध्ये परकीय वित्तसंस्थांनी विक्री केली आहे. सप्ताहामध्ये परकीय वित्तसंस्थांनी समभागामधून ८५७१.७० कोटी रुपये, तर रोख्यांमधून २७९०.०३ कोटी रुपये अशी एकूण ११,३६२.०३ कोटी रुपयांची रक्कम काढून घेतली. देशांतर्गत वित्तसंस्थांनीही विक्रीचाच मार्ग पत्करलेला दिसत आहे. या संस्थांनी सप्ताहामध्ये ३३,९०७ कोटी रुपये बाजारामधून काढून घेतले आहेत.
मिडकॅप आणि स्मॉलकॅप या क्षेत्रीय निर्देशांकांमधील निवडक समभागांना मागणी आहे. आता बाजारातील व्यवहार हे समभागांवर केंद्रित झाले आहेत. या निर्देशांकांमधील कंपन्यांमध्ये मोठी उलाढाल दिसून आली.
बूस्टरमुळे बाजारात सलग दुसऱ्या सप्ताहामध्ये वाढ
बाजारातील व्यवहारांची मर्यादित संख्या आणि अस्थिरता कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 12:10 AM2020-04-20T00:10:49+5:302020-04-20T00:11:10+5:30