Lokmat Money > बिझनेस न्यूज > जीएसटीचे रक्षाबंधन साधायचे तरी कसे?

जीएसटीचे रक्षाबंधन साधायचे तरी कसे?

सध्या सणांचा सीझन चालू आहे, लवकरच भारतात रक्षाबंधन हा सण उत्साहाने साजरा केला जाईल, परंतु जीएसटीमध्ये करदाता कशा प्रकारे आणि केव्हा रक्षाबंधन साजरे करेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 05:36 AM2019-08-12T05:36:02+5:302019-08-12T05:36:15+5:30

सध्या सणांचा सीझन चालू आहे, लवकरच भारतात रक्षाबंधन हा सण उत्साहाने साजरा केला जाईल, परंतु जीएसटीमध्ये करदाता कशा प्रकारे आणि केव्हा रक्षाबंधन साजरे करेल

GST Advice? | जीएसटीचे रक्षाबंधन साधायचे तरी कसे?

जीएसटीचे रक्षाबंधन साधायचे तरी कसे?

- उमेश शर्मा

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, सध्या सणांचा सीझन चालू आहे, लवकरच भारतात रक्षाबंधन हा सण उत्साहाने साजरा केला जाईल, परंतु जीएसटीमध्येकरदाता कशा प्रकारे आणि केव्हा रक्षाबंधन साजरे करेल. अर्थातच सांगायचे झाले तर, इनपूट टॅक्स क्रेडिटची जुळवणी पुरवठादाराच्या (भाऊ) 2अ शी प्राप्तकर्त्याच्या (बहीण) वहीखात्याशी जुळते अथवा नाही जुळत हे पाहणे?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, रक्षाबंधन हा सण पूर्णत: भाऊ व बहिणीमधील घनिष्ट संबंधाचा सण आहे. या सणाच्या वेळी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते व त्या बदल्यात भाऊ तिच्या संरक्षणाचे वचन तिला देत असतो. त्याचप्रमाणे जीएसटीमध्ये विक्री/खरेदीसंबंधी जुळणारे व न जुळणारे बंधन हे इनपूट टॅक्स क्रेडिटसंबंधी पुरवठादाराच्या (भाऊ) व प्राप्तकर्ताच्या (बहीण) वचनपूर्तीसाठी आवश्यक आहे. ॠरळफ-2अ शी वहीखात्यातील खरेदी जुळवून हे होऊ शकते.

अर्जुन : कृष्णा, ॠरळफ-2अ संबंधी कोणत्या गोष्टी सत्याचित करावयाच्या आहेत व त्यासंबंधी असलेल्या अडथळ्यांसंबंधी करदाता कशाप्रकारे तोंड देऊ शकतो?
कृष्ण : अर्जुना, करदात्याला त्याने खरेदी केलेल्या गोष्टीसोबत पुरवठादाराच्या विक्रीशी जुळवणी करणे आहे, अर्थातच ॠरळफ-2अ मध्ये आलेल्या व्यवहारांशी जुळवणी करणे आहे. या जुळवणीत करदात्याला आपल्या घेतलेल्या इनपूट टॅक्स क्रेडिटसोबत ॠरळफ-2अमध्ये असलेल्या इनपूट टॅक्स क्रेडिटसह जुळवणी करणे आवश्यक आहे. जर समजा जुळवणी झाली नाही तरीसुद्धा करदाता त्यासंबंधी असलेल्या न जुळलेल्या इनपूट टॅक्स क्रेडिटचा दावा करू शकतो, परंतु हे कायदेशीर विवादाला उगम देणार आहे.

अर्जुन : कृष्णा, जर पुरवठादाराने टॅक्स इनव्हॉइस अपलोड केले नसेल अथवा त्याने त्याच्या ॠरळफ-1 मध्ये चुकीची माहिती दिली असेल तर त्यासंबंधी काय करावे?
कृष्ण : अर्जुना, जर समजा, पुरवठादाराने आपली विक्रीसंबंधीची माहिती दिली नसेल, चुकीची माहिती ॠरळफ-1 मध्ये दिली असेल तर त्याचा परिणाम हा प्राप्तकर्त्याच्या ॠरळफ-2अ मध्ये चुकीचा अथवा होणार नाही. तर अशा प्रकारच्या प्रकरणात ती चूक पुरवठादाराच्या लक्षात आणून देऊन त्यासंबंधीची दुरुस्ती पुढील ॠरळफ-1 मध्ये करावी.

अर्जुन : कृष्णा, आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या वार्षिक रिटर्न ९ शी ॠरळफ-2अ ची जुळवणी करताना येणारे अडथळे कोणते?
कृष्ण : अर्जुना, करदात्याला वार्षिक रिटर्नमध्ये टेबल क्र. ८ रिटर्नमध्ये घेतलेल्या इनपूट टॅक्स क्रेडिटची जुळवणी ॠरळफ-2अ मध्ये असलेल्या इनपूट टॅक्स क्रेडिटसोबत करावयाची आहे. टेबल 8अ मध्ये असलेला इनपूट टॅक्स क्रेडिट हा दिसेल व रिटर्नमध्ये घेतलेला इनपूट टॅक्स क्रेडिट हा टेबल 8इ मध्ये दिसेल. आर्थिक वर्ष २०१७-१८ संबंधी असलेला इनपूट टॅक्स क्रेडिट जो २०१८-१९ च्या वर्षात घेतला असेल तो टेबल 8उमध्ये दाखवावा लागेल व त्याबद्दल असलेल्या फरकाची कारणे द्यावी लागतील. तरीसुद्धा समजा जर फरक आढळला तर करदाता हा न जुळलेले इनपूट टॅक्स क्रेडिट घेऊ
शकतो.

अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुना, २०१७-१८ च्या आर्थिक वर्षासंबंधी असलेली सर्व दुरुस्ती करण्याची मुदत संपली आहे. तरीसुद्धा आर्थिक वर्ष २०१८-१९ संबंधी असलेल्या टॅक्स इनव्हॉइससंबंधी असलेली दुरुस्ती करदाता करू शकतो. प्राप्तकर्त्याला पुरवठादाराला सांगून ते करून घेणे आवश्यक आहे. या दुरुस्त्या तेव्हाच शक्य आहेत जेव्हा प्राप्तकर्ता व पुरवठादारामध्ये अतूट बंधन आहे. तर या रक्षाबंधन सणामध्ये प्राप्तकर्त्याला व पुरवठादाराला स्वत: त्या दंडापासून वाचविण्याकरिता आपसातील असलेले गोड संबंध जागृत करावे लागतील.

Web Title: GST Advice?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.