- उमेश शर्मा
(लेखक चार्टर्ड अकाउंटंट आहेत)
अर्जुन : कृष्णा, गुढीपाडव्याला नवीन कार्याची सुरूवात केली जाते. एप्रिल २०२१ पासून जीएसटीमध्ये कोणते नवीन बदल करण्यात आले आहेत ?
कृष्ण : अर्जुना, १ एप्रिल २०२१ पासून सर्व करदात्यांना आता वस्तू किंवा सेवा याचे एचएसएन व एसएसी कोड टॅक्स इनव्हॉईसवर देणे बंधनकारक आहे. तसेच ५० कोटी पेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या करदात्यांना ई-इनव्हॉईस देणे बंधनकारक आहे. या वेळेच्या जीएसटीच्या गुढीला एचएसएन कोडची जोड देण्यात आली आहे.
अर्जुन : एचएसएन कोड व एसएसी कोड म्हणजे काय?
कृष्ण : एचएसएन कोड म्हणजे हारमोनाइज सिस्टम नंबर जो वस्तू साठी असतो व एसएसी म्हणजेच सर्विस अकाउंटींग कोड जो सेवांसाठी असतो. यामुळे वस्तू व सेवेचा तपशील आणि कराचा दर संलग्न होतो. चुकीच्या कर दराने वस्तू विकल्यास ते आता जीएसटी विभागाला लगेच समजेल. यामुळे कर आकारणी व निर्धारण अधिक संगणकीकृत आणि अचूक होईल.
अर्जुन : एचएसएन कोड व एसएसी देणे कोणासाठी बंधनकारक आहे?
कृष्ण : ज्या करदात्यांची उलाढाल मागील वर्षी २०२०-२१ मध्ये रूपये पाच कोटीपर्यंत होती त्यांना चार अंकी एचएसएन कोड व रूपये पाच कोटीच्या वर उलाढाल असल्यास सहा अंकी कोड, टॅक्स इनव्हॉईस मध्ये देणे बंधनकारक आहे.
अर्जुन : करदात्यांना सीबीआयसी पोर्टलवर एचएसएन व एसएसी कोड कसे बघता येईल?
कृष्णा : अर्जुन, या लिंक वरती जाऊन तपासावे
1. https://www.cbic.gov.in/resources// htdocs-cbec/gst/GSTratescheduleforgood sason31032021.pdf
2. https://www.cbic.gov.in/resources// htdocs -cbec/gst/11-Rate_Notification-CGST-16.10.2020.pdf
3. https://www.cbic.gov.in/resources// htdocs -cbec/gst/12-Exemption_CGST-16.10.2020.pdf
अर्जुन : करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : आता टॅक्स इनव्हॉईस बनवतांना एचएसएन कोड व एसएसी कोड बरोबर असल्याची खात्री करून घ्यावी.