ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 06 - करव्यवस्थेत ऐतिहासिक बदल घडविणाऱ्या वस्तू व सेवा कर विधेयकाला (जीएसटी) गुरुवारी राज्यसभेत मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे आता देशभरात 1 जुलैपासून जीएसटी लागू होणार आहे.
केंद्रीय जीएसटी, एकिकृत जीएसटी, केंद्रशासित प्रदेश जीएसटी व राज्यांना मिळणाऱ्या जीएसटी नुकसान भरपाईचे विधेयक अशी चार विधेयके आज राज्यसभेत मंजूर करण्यात आली. राज्यसभेत जीएसटी विधेयकावर चर्चा करण्यात आली. यावेळी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले की, जीएसटी विधेयक लागू करण्यास काही हरकत नाही. या विधेयकायच्या मंजूरीचे श्रेय सर्वांना जाते.
एका व्यक्तीला किंवा एका सरकारला या विधेयकाचे श्रेय घेता नाही, असेही ते म्हणाले.
गेल्या महिन्यात लोकसभेत या जीएसटी विधेयकाला मंजुरी देण्यात आली होती.
Happy at the fact that when it comes to enforcing GST bill all political parties came out in one voice: FM Arun Jaitley pic.twitter.com/Wqrn3cvEec
— ANI (@ANI_news) April 6, 2017
GST bill passed in RS today. On 17-18 May we will give final approval to rules & rates; looks like it can be implemented from 1 July: FM pic.twitter.com/7bUOYw1OK4
— ANI (@ANI_news) April 6, 2017
It could be a game changer but can"t assume there will be no difficulties on the way: Former PM Manmohan Singh on #GSTBillpic.twitter.com/xvA9LfQh3k
— ANI (@ANI_news) April 6, 2017