Join us  

जीएसटी विधेयक; उद्योग जगताकडून चिंता व्यक्त

By admin | Published: September 04, 2015 10:01 PM

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक संमत होत नसल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल उद्योग जगताने काळजी व्यक्त केली आहे

नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विधेयक संमत होत नसल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल उद्योग जगताने काळजी व्यक्त केली आहे. मारुती सुझुकीचे अध्यक्ष आर.सी. भार्गव यांनी म्हटले आहे की राजकीय पक्षांनी राष्ट्रीय हिताच्या उपायांवर नव्याने विचार केला पाहिजे. ते शुक्रवारी येथे भागधारकांच्या वार्षिक बैठकीत बोलत होते. भार्गव म्हणाले, ‘जे लोक केवळ अर्थव्यवस्थेचा विचार करतात त्यांना जीएसटी विधेयक राजकीय कारणांमुळे संमत होऊ शकत नाही हे पाहून नैराश्य येते.’ माझ्या दृष्टीने अशी परिस्थिती निराशाजनक आहे. भूसंपादन विधेयकही अडकून पडले आहे; परंतु त्याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही, कारण आमच्याकडे येत्या काही वर्षांत गुजरातमध्ये आमच्या विस्तारासाठी पुरेशी जमीन उपलब्ध आहे, असे भार्गव म्हणाले.(लोकमत न्यूूट नेटवर्क)