Lokmat Money > बिझनेस न्यूज > उत्पादन कंपन्यांसाठी जीएसटी वरदान

उत्पादन कंपन्यांसाठी जीएसटी वरदान

भारतात वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी वस्तू आणि सेवा कर हा वरदान ठरणार असून, याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांनाही होणार आहे.

By admin | Published: October 5, 2016 04:14 AM2016-10-05T04:14:02+5:302016-10-05T04:14:02+5:30

भारतात वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी वस्तू आणि सेवा कर हा वरदान ठरणार असून, याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांनाही होणार आहे.

GST boon for production companies | उत्पादन कंपन्यांसाठी जीएसटी वरदान

उत्पादन कंपन्यांसाठी जीएसटी वरदान

अनेक वस्तू होतील स्वत
मुंबई : भारतात वस्तूंची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी वस्तू आणि सेवा कर हा वरदान ठरणार असून, याचा फायदा सर्वसामान्य ग्राहकांनाही होणार आहे.
कंपन्यांना द्यावा लागणारे विविध शुल्क एकाच करामध्ये समाविष्ट केले जाणार असल्याने करात मोठी बचत होणार आहे. तसेच वाहतूक खर्चातही मोठी कपात होणार असल्याने अनेक वस्तू स्वस्त होतील, असा विश्वा रॅकोल्ड थर्मो प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य वित्तीय अधिकारी कौस्तुभ रोपळेकर यांनी व्यक्त केले.
सध्या उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांना विद्यमान करप्रणालीनुसार केंद्रीय कर, सेवा कर, मूल्यवर्धीत कर शिवाय विक्री कर अशा अनेक करांचा सामना करावा लागतो. हे सर्व कर वस्तूच्या उत्पादन खर्चाच्या अर्ध्या किमतीएवढे होतात. जीएसटी लागू झाल्यानंतर हे सारे कर एकाच करात समाविष्ट होतील. त्यामुळे वस्तूच्या विक्रीच्या किमतीत अर्ध्याने फरक पडू शकतो, त्याचा उपयोग ग्राहकांना होऊ शकेल, असेही रोपळेकर म्हणाले.
अन्य राज्यांमधील त्यांची करप्रणाली व निर्बंध यामुळे काही कंपन्या सामायिक गोदामे तसेच माल साठविण्याची व्यवस्था निर्माण करण्यावर पर्याय स्वीकारतील. जेणेकरून दळणवळणाच्या चढ्या किमतींमध्ये घट होण्याचा प्रयत्न होऊ शकेल.

Web Title: GST boon for production companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.