नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती अतिशय बिकट असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारसाठी दिलासा देणारी बातमी आली आहे. जीएसटी (वस्तू-सेवाकर) संकलनाचा आकडा सलग दुसऱ्या महिन्यात एक लाख कोटीच्या वर गेला आहे.
डिसेंबर 2019 या महिन्यात एक लाख 3 हजार 184 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. याआधी नोव्हेंबर महिन्यात एकूण 1,03,492 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते. तर ऑक्टोबर महिन्यात 95,380 कोटी रुपये आणि सप्टेंबर महिन्यात 91,916 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते.
GST December collections jump by 16 pc year-on-year to Rs 1.03 lakh crore
— ANI Digital (@ani_digital) January 1, 2020
Read @ANI story | https://t.co/dDyQEFGh4Zpic.twitter.com/kixft3YZU5
उपकर 8,331कोटी
एकूण जीएसटीमध्ये केंद्रीय जीएसटी (सीजीएसटी) 19,962 कोटी रुपये, तर राज्य जीएसटी (एसजीएसटी) 26,792 कोटी रुपये वसूल झाले आहेत. एकात्मिक जीएसटी (आयजीएसटी) 48,099 कोटी रुपये आहे. उपकर 8,331कोटी रुपयांचा आहे.
दरम्यान, सरकारने जीएसटी संकलन वाढविण्यासाठी जास्त प्रयत्न करत आहे. नवीन योजना सुचविण्यासाठी आणि जीएसटी सिस्टिम आणखीच मजबूत करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकाऱ्यांचा समावेश आहे. याशिवाय, केंद्र सरकारने टॅक्स चोरीच्या विरोधात अभियान सुरु केले आहे. जे लोक खोटी बिले दाखवून फायदा घेत आहेत. त्यांच्याविरोधात चौकशी वेगाने करण्यात येत आहे.