नवी दिल्ली : आॅगस्ट महिन्यामध्ये देशातील वस्तू आणि सेवाकराचे (जीएसटी) संकलन कमी झाले असल्याची माहिती अर्थमंत्रालयातर्फे देण्यात आली आहे. जीएसटी संकलनात घट होण्याचा हा सलग दुसरा महिना आहे.आॅगस्ट महिन्यात देशातून ८६,४४९ कोटी रुपयांच्या जीएसटीचे संकलन झाले. त्याआधीच्या जुलै महिन्यात ८७,४२२ कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला होता. मात्र या दोन्ही महिन्यात जीएसटीची रक्कम आधीच्या महिन्यापेक्षा कमी झाली आहे.
कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे या आधी जीएसटीचे संकलन मोठ्या प्रमाणावर घटले होते. आता दैनंदिन व्यवहार सुरू होऊ लागल्याने संकलन वाढत असले तरी त्यामध्ये फारशी वाढ दिसून येत नाही.या महिन्यात सीजीएसटी १५,९०६ कोटी रुपये, तर एसजीएसटी २१,०६४ कोटी रुपये जमा झाला आहे. आयजीएसटी ४२,२६४ कोटी रुपये तर उपकर ७,२१५ कोटी रुपये जमा झाला आहे.
वार्षिक १२ टक्क्यांची घट
मागील वर्षाच्या आॅगस्ट महिन्याच्या तुलनेत यावर्षी जीएसटीच्या संकलनात १२ टक्क्यांनी घट झाली आहे. मागील वर्षी ९८,२०२ कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला होता. यावर्षी तो ८६,४४९ कोटी रुपयांवर घसरला आहे.
सलग दुसऱ्या महिन्यात झाली जीएसटीच्या संकलनात घट
आॅगस्ट महिन्यात देशातून ८६,४४९ कोटी रुपयांच्या जीएसटीचे संकलन झाले. त्याआधीच्या जुलै महिन्यात ८७,४२२ कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला होता.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 01:50 PM2020-09-03T13:50:35+5:302020-09-03T14:01:06+5:30