Join us  

वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारसाठी गुड न्यूज; GST कलेक्शनमध्ये 10% वाढ...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2024 6:43 PM

GST Collection in December 2023: एकूण जीएसटी संकलनाचा आकडा सूमारे 15 लाख कोटींवर पोहोचला.

GST Collection in December 2023: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारसाठी आनंदाची बातमी आली आहे. डिसेंबरमध्ये GST संकलनात 10 टक्के वाढ झाली आहे. अर्थ मंत्रालयाच्या माहितीनुसार, डिसेंबरमध्ये एकूण 1.64 लाख कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले आहे. तर, एप्रिल ते डिसेंबर 2023 पर्यंत सकल जीएसटी संकलनात 12 टक्क्यांनी वाढ झाली होऊन, हा आकडा 14.97 लाख कोटींवर पोहोचला आहे.

डिसेंबर 2023 मध्ये एकूण GST संकलन ₹ 1,64,882 कोटी झाले. यामध्ये केंद्रीय जीएसटी (CGST) 30,443 कोटी रुपये, तर राज्य जीएसटी (SGST) ₹37,935 कोटी आहे आणि इंटीग्रेटेड जीएसटी (IGST) ₹84,255 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या ₹41,534 कोटींसह) आहे. तर, उपकर ₹12,249 कोटी राहिला(माल आयातीवर गोळा केलेल्या ₹1,079 कोटींसह). विशेष म्हणजे 2023 सालचा आतापर्यंतचा हा सातवा महिना आहे, ज्यामध्ये ₹1.60 लाख कोटींहून अधिक GST संकलन झाले आहे.

IGST मधून 40,057 कोटी रुपये CGST आणि 33,652 कोटी रुपये SGST मध्ये जातील. सेटलमेंटनंतर डिसेंबर 2023 मध्ये केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल CGST साठी ₹ 70,501 कोटी आणि SGST साठी ₹ 71,587 कोटी असेल. डिसेंबर 2023 मधील महसुल मागील वर्षीच्या याच महिन्यातील GST महसुलापेक्षा 10.3 टक्के अधिक आहे. 

टॅग्स :जीएसटीभारतकेंद्र सरकारअर्थव्यवस्थाव्यवसायगुंतवणूक