Budget 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > GST Collection: मार्च महिन्यात विक्रमी GST कलेक्शन; सरकारी तिजोरीत जमा झाले 'इतके लाख कोटी' रुपये

GST Collection: मार्च महिन्यात विक्रमी GST कलेक्शन; सरकारी तिजोरीत जमा झाले 'इतके लाख कोटी' रुपये

GST Collection: मार्च महिन्यातील जीएसटी संकलनाच्या आकडेवारीने जानेवारीच्या विक्रमाला मागे टाकत नवा विक्रम केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 05:39 PM2022-04-01T17:39:09+5:302022-04-01T17:41:56+5:30

GST Collection: मार्च महिन्यातील जीएसटी संकलनाच्या आकडेवारीने जानेवारीच्या विक्रमाला मागे टाकत नवा विक्रम केला आहे.

GST Collection: Record GST Collection in March 2022; GST collection all time high of Rs 1.42 lakh crore in March | GST Collection: मार्च महिन्यात विक्रमी GST कलेक्शन; सरकारी तिजोरीत जमा झाले 'इतके लाख कोटी' रुपये

GST Collection: मार्च महिन्यात विक्रमी GST कलेक्शन; सरकारी तिजोरीत जमा झाले 'इतके लाख कोटी' रुपये

नवी दिल्ली: कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यामुळे कोलमडलेली भारताची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येताना दिसत आहेत. जीएसटी संकलनाची(GST Collection) मार्च महिन्याची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीवरुन भारताची अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे जाणवत आहे. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मार्च महिन्यात जीएसटी संकलन 1.42 लाख कोटी रुपये झाले आहे.

2020 च्या तुलनेत 46% अधिक संकलन
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2022 च्या जीएसटी संकलनात गेल्या वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत 15 टक्के वाढ झाली आहे. तर, मार्च 2020 च्या तुलनेत जीएसटी संकलनात 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अर्थ मंत्रालयाने म्हटले की, "एकूण GST संकलन मार्च 2022 मध्ये नवीन उच्चांकावर पोहोचले आहे. या आकडेवारीने जानेवारी 2022 च्या 1,40,986 कोटी रुपयांच्या पूर्वीच्या विक्रमाला मागे टाकले आहे."

कलेक्शनाचा सोर्स जाणून घ्या
मार्च 2022 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1,42,095 कोटी रुपये झाले आहे. यामध्ये CGST द्वारे सरकारला रु. 25,830 कोटी, SGST द्वारे रु. 32,378 कोटी, IGST द्वारे रु. 74,470 कोटी (माल आयातीतून रु. 39,131 कोटी उत्पन्नासह) आणि रु. 9,417 कोटी उपकर (माल आयातीच्या 981 कोटींसह) आहे.

चौथ्या तिमाहीतील सर्वोत्तम कलेक्शन
आर्थिक वर्ष 2021-22 च्या चौथ्या तिमाहीत सरासरी मासिक सकल GST संकलन 1.38 लाख कोटी रुपये होते. पहिल्या तिमाहीत सरासरी 1.10 लाख कोटी रुपये, दुसऱ्या तिमाहीत 1.15 लाख कोटी रुपये आणि तिसऱ्या तिमाहीत 1.30 लाख कोटी रुपये होते.
 
असे झाले सेटलमेंट
मार्च महिन्यात सरकारने CGST मध्ये 29,816 कोटी रुपये आणि IGST पैकी 25,032 कोटी रुपये जमा केले आहेत. रेगुलेर आणि एड-हॉक सेटलमेंटनंतर, मार्च 2022 मध्ये केंद्राचे एकूण उत्पन्न 65,646 कोटी रुपये आणि राज्याचे एकूण उत्पन्न 67,410 कोटी रुपये होते. मंत्रालयाने म्हटले की, "आर्थिक पुनर्प्राप्ती आणि चोरीला आळा घालण्यासाठी केलेल्या कारवाईमुळे, विशेषत: बनावट बिल देणाऱ्यांविरुद्ध जीएसटी संकलनात वाढ झाली आहे.'' 

Web Title: GST Collection: Record GST Collection in March 2022; GST collection all time high of Rs 1.42 lakh crore in March

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.