Lokmat Money > बिझनेस न्यूज > गुड न्यूज! GST संकलनाचा वेग कायम; ऑगस्ट महिन्यात झाली मोठी वाढ

गुड न्यूज! GST संकलनाचा वेग कायम; ऑगस्ट महिन्यात झाली मोठी वाढ

वस्तू आणि सेवा कर संकलनाचा वेग कायम असून ऑगस्ट महिन्यात सरकारला १.१२ लाख कोटी मिळाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 06:12 PM2021-09-01T18:12:25+5:302021-09-01T18:13:07+5:30

वस्तू आणि सेवा कर संकलनाचा वेग कायम असून ऑगस्ट महिन्यात सरकारला १.१२ लाख कोटी मिळाले आहेत.

gst collection remains highest second time in a row modi govt collects rs 1 12 lakh crore for august | गुड न्यूज! GST संकलनाचा वेग कायम; ऑगस्ट महिन्यात झाली मोठी वाढ

गुड न्यूज! GST संकलनाचा वेग कायम; ऑगस्ट महिन्यात झाली मोठी वाढ

मुंबई: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेने २०.१ टक्क्यांचा विक्रमी वृद्धिदर गाठल्यानंतर केंद्रातील मोदी सरकारसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. वस्तू आणि सेवा कर संकलनाचा वेग कायम असून ऑगस्ट महिन्यात सरकारला १.१२ लाख कोटी मिळाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत या ऑगस्टमध्ये GST महसूल ३० टक्क्यांनी वधारला आहे. (gst collection remains highest second time in a row modi govt collects rs 1 12 lakh crore for august)

घे भरारी! देशाच्या अर्थव्यवस्थेची विक्रमी कामगिरी; पहिल्या तिमाहीत २०.१ टक्के नोंदवला GDP

गेल्या दोन महिन्यात अर्थव्यवस्था कोरोना संकटातून सावरली असून, स्थानिक पातळीवर निर्बंध शिथिल झाल्याने बाजारपेठांमधील रेलचेल वाढली. परिणामी जीएसटी संकलनात वाढ झाली, असे सरकारने म्हटले आहे. 

सलग आठ महीने एक लाख कोटी रुपयांवर

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जीएसटी संकलनाची आकडेवारी जाहीर केली. ऑगस्ट महिन्यात जीएसटीमधून १,१२,००० कोटींचा महसूल मिळाला आहे. यात सीजीएसटी २०,५२२ कोटी, एसजीएसटी २६,६०५ कोटी आणि आयजीएसटी ५६,२४७ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर वसूली झालेल्या २६,८८४ कोटी रुपयांसह) आणि उपकर ८६४६ कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर वसूली झालेल्या ६६ कोटी रुपयांसह) यांचा समावेश आहे, असे सांगण्यात आले आहे. जीएसटी महसूल सलग आठ महीने एक लाख कोटी रुपयांवर राहिला होता. जून २०२१ मध्ये तो १ लाख कोटी रुपयांच्या खाली आला.

जबरदस्त! आता OLA मध्ये गुंतवणुकीची भन्नाट संधी; लवकरच IPO येणार, ११ हजार कोटी उभारणार

दरम्यान, ऑगस्टमध्ये मासिक आधारावर जीएसटी कर महसूल किंचित घसरला आहे. मोदी सरकारला जुलै महिन्यात जीएसटीमधून १,१६,३९३ कोटींचा विक्रमी महसूल मिळाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत कर संकलनात ३३ टक्के वाढ झाली होती. तत्पूर्वी, चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून या तिमाहीत फिनिक्स भरारी घेत २०.१ टक्के आर्थिक विकास दर (जीडीपी) नोंदवला आहे. 
 

Web Title: gst collection remains highest second time in a row modi govt collects rs 1 12 lakh crore for august

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.