Join us  

सरकारची तिजोरी भरली! जीडीपीनंतर जीएसटी संकलनातही मोठी झेप, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2023 3:21 PM

ऑगस्टमध्ये जीएसटी संकलनात ११ टक्के वाढ झाली आहे.

अर्थव्यवस्थेसंदर्भात कालच एक आनंदाची बातमी समोर आली होती. आता या पार्श्वभूमीवर आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. ऑगस्टमध्ये जीएसटी संकलनात ११ टक्के वाढ झाली आहे. महसूल सचिव संजय मल्होत्रा ​​यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन सुमारे १.६ लाख कोटी रुपये होते. यापूर्वी जुलैमध्ये ते १,६५,१०५ कोटी रुपये होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑगस्टमध्ये जीएसटी संकलन ११ टक्क्यांनी वाढले आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये वस्तू आणि सेवा करमधून १,४३,६१२ कोटी रुपये जमा झाले. 

George Soros: भारतीय उद्योजकांवर आरोप अन् मोदींचा राग...जॉर्ज सोरोसची 'कुंडली' काय?

मल्होत्रा ​​म्हणाले की, वार्षिक आधारावर अंदाजे ११ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जीएसटीची आकडेवारी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जाहीर होईल. एप्रिल ते जून या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर ७.८ टक्के होता. जून तिमाहीत जीएसटी महसूल ११ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. याचा अर्थ कर-जीडीपी गुणोत्तर १.३ पेक्षा जास्त आहे.

जीएसटी संकलनाची ही पाचवी वेळ आहे जेव्हा १.६ लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. रक्षाबंधनाने देशात सणांची सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या काळात लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. 

दिवाळीनिमित्त खरेदी करणे शुभ मानले जाते. म्हणजेच येत्या काही महिन्यांत जीएसटी संकलनात आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी, सरकारने जीडीपीची आकडेवारी काल म्हणजेच ३१  ऑगस्ट रोजी जाहीर केली होती. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी ७.८ टक्के दराने वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत जीडीपीचा विकास दर ६.१ टक्के होता.

टॅग्स :जीएसटीव्यवसाय